‘मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का?’

‘मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का?’

शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर यांनी बाबरी मशीद पतनासंदर्भात ट्विट केले असून त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नार्वेकर यांना खोचक प्रश्न विचारला आहे. आजच्या दिवशी म्हणजेच ६ डिसेंबर १९९२ रोजी रोजी अयोध्येत १६व्या शतकात बांधण्यात आलेली बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट केले आहे. त्यावरून नारायण राणे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

मिलिंद नार्वेकर यांनी आज ६ डिसेंबरचे निमित्त साधून एक फोटो ट्वीट केला आहे. त्या फोटोत बाबरी मशीद पाडण्यासाठी गेलेला जमाव मशिदीवर चढत असल्याचे दिसते आहे. तसेच त्या फोटोवर एक ओळ लिहिलेली आहे. त्यात असे म्हटले आहे की, अयोध्या के राम मंदिर के निर्माण हेतु शिवसैनिकों के बलिदान को कोटी कोटी नमन…या ट्वीट नंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना यासंबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का, असा खोचक सवाल विचारला.

हे ही वाचा:

‘काही संकुचित वृत्तीची माणसे देशाला खाली खेचतात’

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष स्वीकारणार हिंदू धर्म…वाचा सविस्तर

वानखेडे कसोटी भारताने चौथ्या दिवशीच जिंकली

भारताच्या संविधानाचा मसुदा ज्यावर टाईप केला त्या टाईपरायटरचे होणार जतन

आजच्याच दिवशी ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत १६व्या शतकात बांधण्यात आलेली बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्यानंतर देशभरात दंगली उसळल्या होत्या. त्यात जवळपास दोन हजार लोक मारले गेले. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा हे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केले असेल, तर मला त्याचा अभिमान आहे, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.

Exit mobile version