खणखणीत नाणे, नारायण राणे

खणखणीत नाणे, नारायण राणे

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. यानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाचे कार्यकर्ते हा विजय साजरा करताना दिसतच आहेत. पण या सोबतच मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी अशा संपूर्ण कोकण पट्ट्यात भाजपा कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत.

यावेळी भाजपा नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाने जयघोष होताना दिसत आहे. ‘खणखणीत नाणे, नारायण राणे’ अशा घोषणा पाहायला मिळत आहे. भाजपचे स्थानिक नेते प्रमोद जठार यांनी देखील माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘खणखणीत नाणे, नारायण राणे’ हीच आमची घोषणा असल्याचे जठार यांनी सांगितले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण निवडणुकीत सर्व विरोधकांचा सुपडा साफ करत भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे.

हे ही वाचा:

समीर वानखेडे यांचा एनसीबी कार्यकाळ संपला; कशी होती त्यांची कारकीर्द?

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचे वर्चस्व

श्रीनगरमधील चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार

मुंबई हाय अलर्टवर, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत विजयी झेंडा रोवल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. गुलालाची उधळण करत, नाचत, फुगडी घालत भाजपा कार्यकर्ते आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. तर अनेक ठिकाणी भाजपा कार्यालयाच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी होताना दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक शिवसेनेतर्फे फारच प्रतिष्ठेची करण्यात आली होती. या निवडणुकीला नितेश राणेंवर झालेल्या मारहाणीच्या आरोपाची देखील पार्श्वभूमी होती. नितेश राणे यांना सिंधुदुर्ग कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर शिवसेनेने फटाके फोडत जल्लोष केला होता. यावेळी भाकपा कार्यकर्त्यांनी आम्ही सिंधुदुर्ग बँकेच्या निकालाच्या दिवशी बॉम्ब फोडू असे सांगितले होते. त्यानुसार भाजपचे कार्यकर्ते आता जोरदार आतषबाजी करताना दिसत आहेत.

दरम्यान जिल्हा बँकेतील विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबई येथील निवासस्थानाबाहेरही मोठ्या प्रमाणात विजयोत्सव साजरा करण्यात आला आहे. तर राणे हे सिंधुदुर्गसाठी रवाना झाल्याचीही माहिती मिळत आहे

Exit mobile version