नारायण राणे दुपारी घेणार बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे दर्शन

नारायण राणे दुपारी घेणार बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे दर्शन

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे दोन दिवसांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मुंबईत असतील. त्यावेळी ते दादर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट देणार आहेत. १९ आणि २० ऑगस्ट या दोन दिवसांच्या जनआशीर्वाद यात्रेत नारायण राणे कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना प्रोत्साहन देणार आहेत. तसेच सर्वसामान्यांशीही संवाद साधणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे यांची ही भेट महत्त्वाची ठरेल.

केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेले सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील हे जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत.

हे ही वाचा:

आता हिंदू धर्माविषयी शिका आणि पदवी मिळवा

लाखोंची रोकड तर सापडली, पण बघून धक्काच बसला!

उद्योजकांच्या सुरक्षेवरून फडणवीसांनी केली ठाकरे सरकारची कान उघाडणी

शेअर मार्केटचा घोटाळेबाज हर्षद मेहताच्या ‘या’ सहकाऱ्याला पकडले

नारायण राणे यांचे सकाळी १० वाजता मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते पुष्पहार अर्पण करतील. तेथे त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही होईल. त्यानंतर १०.५५ वाजता टीचर्स कॉलनी, बांद्रा येथे जनसामान्यांना ते मार्गदर्शन करतील. त्यावेळी माजी आमदार तृप्ती सावंत, प्रवीण नलावडे आदि उपस्थित राहतील. सव्वा अकराला ते माहीम कोळीवाडा येथील स्वामी विवेकानंद उद्यानात जातील. तेथून ते माहीम दर्गा कापड बाजार येथे जातील. मग ते दादरच्या वीर सावरकर स्मारकाला भेट देणार आहेत. १२ वाजता ते दादरच्याच बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट देतील. १२.२५ वाजता प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिराला भेट देतील. संध्याकाळी सहा वाजता लालबागचा राजा मंडळाला भेट देऊन तिथे त्यांचे भाषण होईल. रात्री आठ वाजता शहीर तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाला ते पुष्पहार अर्पण करतील. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता ते निवासस्थानी पत्रकार परिषद घेतील.

Exit mobile version