काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन, भाजपच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर भाजप आणि सेनेमध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. शिवसेना नेते विनायक राऊत यांनी बुधवारी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला होता. त्या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नारायण राणे यांनी ट्विट करत खासदार विनायक राऊत यांना उत्तर दिले आहे. ‘खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी’, असे म्हणत नारायण राणे यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणतात, ‘लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून जिची हत्या झाली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली, त्यांचीही चौकशी परत होईल. एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले ‘बॉस’ आणि आपण कुठे धावणार?’ असा प्रश्नही राणे यांनी केला आहे.
खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी
लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले.— Narayan Rane (@MeNarayanRane) February 18, 2022
बऱ्याच दिवसांपासून सेना आणि भाजपा मध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनीदेखील पत्रकार परिषद घेऊन सेनेवर टीकास्त्र सोडले होते. त्या टीकेला सेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. नारायण राणेंच्या मागे जेव्हा ईडी लावली तेव्हा ते भाजपासाठी सरेंडर झाले, असे म्हणत राऊत यांनी तीन व्हिडीओ दाखवत राणेंवर टीकास्त्र सोडले होते. त्यावर आज पुन्हा नारायण राणे यांनी विनायक राऊत यांना प्रत्युत्तर केले आहे.
हे ही वाचा:
‘कुराणात हिजाब अनिवार्य आहे असे म्हटल्याचा पुरावा द्या!’
रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
कर्कश सायलेन्सर बसवणाऱ्यांचे ‘१००’ अपराध भरले…
भाजपाची गीतापठणाची मागणी; सपाचा विरोध
रोज आरोप प्रत्यारोप होत असतानाच नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथल्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार असून बंगल्याची तपासणी करण्यासाठी महापालिकेने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे वाद रंगण्याची शक्यता आहे.