केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राणे यांना आता ‘झेड’ दर्जाचे सुरक्षा कवच पुरवण्यात आले आहे. शुक्रवार, ३ डिसेंबर रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भातील निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशाने हे सुरक्षा कवच वाढवण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने केलेली एक चूक या निर्णयाला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जनआशिर्वाद यात्रे दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्रमक भाषेत टीका केली होती. यानंतर राणे यांना अटक करण्यात आली होती. नारायण राणे यांना नियमबाह्य पद्धतीने अटक केल्याचा आरोप तेव्हा ठाकरे सरकारवर झाला होता. या सर्व प्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मागवण्यात आला होता. त्यानंतरच राणे यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे राणे यांच्या सुरक्षेत वाढ व्हायला ठाकरे सरकारची चूकच कारणीभूत असल्याची चर्चा रंगताना दिसत आहे.
हे ही वाचा:
एटीएम पडले मागे; लोक करत आहेत घरबसल्या व्यवहार
चिडलेले शेतकरी शांत होऊन गेले! कंगनाने असे काय केले?
‘पुणेकरांच्या मनात केवळ आणि केवळ भाजपा आहे’
पाकिस्तानात ईश्वरनिंदेवरून एका श्रीलंकन नागरिकाची निघृण हत्या
आधी होती ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आधी वाय प्लस दर्जाचे सुरक्षा कवच देण्यात आले होते. या अंतर्गत त्यांच्यासोबत एकूण ११ सुरक्षा रक्षक असायचे ज्यामधे २‐४ कमांडो आणि बाकीचे पोलिस होते.
पण आता त्यांना झेड दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा रक्षकांची संख्या २२ वर गेली आहे. ज्यामध्ये ४‐६ कमांडो आणि बाकीचे पोलिस असणार आहेत.