26 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारणनारायण राणेंची महत्वाच्या मंत्रिमंडळ समितीवर नियुक्ती

नारायण राणेंची महत्वाच्या मंत्रिमंडळ समितीवर नियुक्ती

Google News Follow

Related

केंद्रीय मंत्रिमंडळात फेर बदल करण्यात आल्यानंतर आता मंत्रिमंडळ समित्यांमध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ समित्यांमध्ये नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. नारायण राणेंपासून ते मनसुख मंडवियांपर्यंत अनेक मंत्र्यांना मंत्रिमंडळ समित्यांवर नेमण्यात आले आहे.

गुंतवणूक आणि अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठीच्या समितीत नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधिया, अश्विनी वैष्णव यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करत असते. तर रोजगार आणि कौशल्य संबंधित समितीमध्ये धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, हरदीप पुरी, आरसीपी सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. या कमिटीचे अध्यक्षपदही पंतप्रधानांकडे आहे.

संसदीय व्यवहार संबंधित मंत्रिमंडळ समितीत अर्जुन मुंडा, विरेंद्र कुमार, किरण रिजिजू, अनुराग ठाकूर यांचा समावेश करण्यात आला आहे. या कमिटीचे अध्यक्षपद संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे आहे. तर राजकीय विषयांशी संबंधित समितीत स्मृती ईराणी, सर्वानंद सोनोवाल, गिरीराज सिंह, मनसुख मंडविया, भूपेंद्र यांचा समावेस करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या समितीचे अध्यक्ष आहेत.

हे ही वाचा:

खडसेंसाठी महत्वाचा झोटिंग समितीचा अहवाल गहाळ

पहिल्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे सदस्य यशपाल शर्मा कालवश

महागाई नियंत्रणात आणण्यात मोदी सरकारला यश

एअरटेल ५जी मुंबईत लवकरच सुरु

मंत्रिमंडळाचा विस्तार करताना १२ केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांनीही राजीनामे दिले होते. त्यामुळे अनेक समित्यातील पदे रिक्त झाली होती. त्यामध्ये नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा