‘ज्यांना दूध पाजले म्हणता त्या शिवसैनिकांचा त्याग, मेहनत आहे पक्षवाढीत’

नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

‘ज्यांना दूध पाजले म्हणता त्या शिवसैनिकांचा त्याग, मेहनत आहे पक्षवाढीत’

उद्धव ठाकरे यांनी गोरेगावमध्ये केलेल्या भाषणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे वाचून दाखवत त्यांनी त्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आम्ही त्यांना दूध पाजले, त्यांनी आमच्याशी गद्दारी केली असे तुम्ही म्हणता पण तुम्ही दूध पाजलेत ते सत्तेसाठी. शिवसैनिकांचा त्याग आहे. मेहनत आहे परिश्रम आहे. एक टक्काही तुमचा याच्याशी संबंध नाही.दूध पाजलेत मग खोके, पेट्यारूपी तूप कुणी खाल्ले?

राणे म्हणाले की, जेव्हा शिवसेना पक्ष स्थापन झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात. शिवसैनिक मरत होते, जेलमध्ये जात होते. आपल्या आयुष्यात ६२ वर्षांचे तुमचे वय आहे पण पक्षवाढीसाठी संघर्ष तरी केला का. काहीही न करता सरळ मुख्यमंत्रीपदावर बसलात. आयत्या बिळावर नागोबा. आता गटप्रमुख आठवले. सत्तेत असताना गटनेत्यांची निवेदने घेतली.  कुणाला किती नोकऱ्या दिल्या? घर कुणाला दिले, आजारपणाला पैसे किती आणि कुणाला दिले? मी उद्धव ठाकरे यांना लबाड लांडगाच म्हणेन. ते नेहमी खोटे बोलतात.

राणे यांनी सांगितले की, युतीने निवडणूक जिंकली. मुख्यमंत्री करत नाहीत म्हटल्यावर भाजपाशी गद्दारी करून गेले आघाडीत. साहेब आयुष्यभर काँग्रेस राष्ट्रवादीशी झगडले. पण हे केवळ मुख्यमंत्रीपदासाठी गेले. मुंबईवर गिधाडे फिरायला लागली, असे म्हणता हे चांगले शब्द नाहीत. देशाचा कारभार सांभाळणाऱ्या एका नेत्याला अशी उपमा देताना मनाची लाज वाटली पाहिजे. युती असताना परवापर्यंत अमित शहा यांना फोन करत होते. मला मंत्रिपद देऊ नये म्हणून फोन करत होते.

मोदींच्या नावावर खासदार आणदार निवडून आणले. पाच खासदार, १० आमदार निवडून आणायची ताकद नाही तुमची. जे आठवण काढतात बाळासाहेबांची त्याला चोरी कशी म्हणता. साहेब असे कधी नव्हते. मोठ्यांचा आदर करायचे, बोलवायचे. म्हणून उद्धव ठाकरे यांना टीका करण्याचा अधिकार नाही, असेही राणे म्हणाले.

मुंबई महानगरपालिका धुतली आहे यांनी १५-१५ टक्के घेतायत. त्यासाठी कलानगरला ऑफिस उघडलं. कोण किती टक्का देतो त्या ठेकेदारांना समोर आणावं लागेल. बकाल केली मुंबई. जागतिक कीर्तीचे शहर. दुर्दशा केली. यांनी डबघाईला आणल्या संस्था. मुंबई ही मातृभूमी आहे म्हणतात पण काय केलंत त्यासाठी. एखादी तरी योजना आखलीत का?

मराठी माणसाला हद्दपार केले

ज्या भावना गवळी यांनी शिवसेनेसाठी इतकी वर्षे काम केले त्यांच्याबद्दल काय बोलता? एका स्त्रीला बोलता याचे भान ठेवा. मराठी माणसाला हद्दपार करण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचाच हात आहे त्यांनी मराठी माणसाच्या हिताच बोलू नये.

निवडणुका आल्यावर मुंबई दिसते परंतु मुंबईवर संकट येते तेव्हा मुंबई दिसत नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला होता त्याला उत्तर देताना राणे म्हणाले की, मुंबईवर संकट आल्यानंतर केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा हे नेहमी मुंबई आणि महाराष्ट्राला मदत करतात. कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली की धावून येतात. पण मुंबईत दंगली झाल्या त्यावेळी तुम्ही मातोश्रीमध्ये लपून बसता अशी टीकाही राणे यांनी केली.

हे ही वाचा:

‘मालाडची स्मशानभूमी तोडलीत; मढचे स्टुडिओ का तोडले नाहीत?’

दसरा मेळाव्याला कुणालाही परवानगी नाही

एबीजी शिपयार्डचे माजी सीएमडी ऋषी अग्रवाल यांना अटक

मोबाईल चार्जिंगच्या नादात ब्रेकच्या जागी दाबले एक्सलरेटर आणि

केसालाही धक्का लागला तर..

भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहकाऱ्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्रात तुम्हाला फिरू देणार नाही असा थेट इशाराच नारायण राणे यांनी दिला आहे.

Exit mobile version