‘शिवसेनाप्रमुखांनी कधीही खंजीर खुपसून सत्ता स्थापन केली नाही’ म्हणणारे आता काय करतायत?

‘शिवसेनाप्रमुखांनी कधीही खंजीर खुपसून सत्ता स्थापन केली नाही’ म्हणणारे आता काय करतायत?

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत असलेले शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी याआधी शरद पवारांबद्दल कोणते उद्गार काढले होते याचा पाढा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखविला.

राणे यांनी उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वीची विधानेच पत्रकारांना वाचून दाखविली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणाले होते की, पवार साहेबांना विनंती आहे की, धरणाच्या आत अजित पवारांना नेऊ नका… प्रत्येक सिंचनाचे प्रकल्प दिवट्याने अर्धवट टाकले हे मुद्दाम बघा… शेतकरी कर्जमुक्त व्हावे म्हणून मी फिरलो, कृषिमंत्री म्हणून पवारांनी काय केले?

काँग्रेस, राष्ट्रवादी म्हणजे रिकामी डबकी. शिवसेनाप्रमुखांनी खंजिर खुपसून कोणतेही सरकार स्थापन केले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणत असत पण आज काय परिस्थिती आहे. त्यांनी युतीत असतानाही गद्दारी केली.

राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे मध्यंतरी बारामतीत गेले पण तिथे ते शेतकऱ्यांबद्दल चकार शब्द बोलले नाहीत. एसटीच्या जवळपास ३० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याबद्दल तरी बोलायला हवे होते. राज्याची अवस्था काय आहे आणि इथे टिंगल मस्करी चालू आहे फक्त.

 

हे ही वाचा:

‘वोक’ बायडन यांना मोठा झटका

ठाकरे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही, माझं चॅलेंज आहे

उत्तरप्रदेश, हरियाणानंतर मध्यप्रदेशात येणार ‘हा’ कायदा

चिमुरडीने का लिहिले सरन्यायाधीशांना पत्र?

 

डेलकर हे सातवेळा निवडून आले होते. ते गेल्यावर त्यांच्या पत्नी निवडून आल्या. त्यांची तिथे सुरुवातीपासूनच प्रतिमा होती त्यात शिवसेनेचे काही नाही. शाखाप्रमुख पण नाही. जिंकल्यावर मात्र पुढे पुढे करत आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी खासदारपद टिकवावे नाहीतर ते भाजपात येतील, असेही राणे म्हणाले.

Exit mobile version