केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा टोला
बाळासाहेब गेले आणि ठाकरी शैली तिथेच संपली. ती शैली तो आवेश आता पाहायला मिळणार नाही. कुणी तसा आव मात्र आणू नका. तशी भाषाशैलीही आता नाही. अनेक प्रसंग मी जवळून पाहिले आहेत. केवळ आडनाव लावले म्हणजे ठाकरे भाषा येत नाही. गुणात्मक कृती दिसली पाहिजे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत आपले रोखठोक मत व्यक्त केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या शेरेबाजीमुळे नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. त्यानिमित्ताने राणे यांनी विविध मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली.
राणे म्हणाले की, ठाकरी भाषा विधायक, राज्याच्या हितासाठी असेल तर मी स्वागत करेन. आकसाने, सूडबुद्धीने जर कारवाई करत राहिले तर जशास तसे उत्तर द्यावे लागेल. मी मुद्दामहून कळ काढायला जाणार नाही.
हे ही वाचा:
शाळा सुरू करण्यासाठी लसीकरण कशाला हवे?
नाट्यसमीक्षेला एक वेगळी उंची देणारा जयंत!
मोनिकाच्या हाताच्या स्पर्शातून त्यांना जाणवले मुलाचे अस्तित्व
यंदा विमान तिकीट आरक्षणाची गगनाला गवसणी!
अनेक प्रसंग आले शिवसेनेत असतानाही आले शिवसेना सोडल्यावरही अनेक प्रकार घडत आहेत. मी खचून जात नाही. माझे खच्चीकरण होत नाही. अटकेची घटना घडायच्या आतही मला लोक भेटत होते. कोकणात मला एवढे प्रेम मिळाले की मी भारावून गेलो. सावंतवाडीत रात्री १२ वाजता हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. मैदान पूर्ण भरले होते. जनतेचे प्रेम किती आहे, जनता कसा प्रतिसाद देत आहे ते कळते.