34 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरराजकारणसंजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर

संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर

Google News Follow

Related

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या फ्लॉप साडे तीनच्या शो नंतर भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयातून पत्रकार परिषद घेत संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे. संजय राऊत यांचा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर डोळा आहे असा गौप्यस्फोट राणे यांनी केला आहे. तर संजय राऊतांची सगळी कुंडली आपल्याकडे असून आपण ती बाहेर काढणार असल्याचेही राणे यांनी सांगितले.

संजय राऊत रोज सांगत फिरतात की मी कोणाला घाबरत नाहीत, पण मग संजय राऊत यांना घाम फुटला? त्यांच्या परिषदेत स्थानिक विभाग प्रमुख पण नव्हता, पण नाशिकचे लोक आले होते. एवढे दिवस संजय राऊतांपाना सेना भवन आठवले नाही का? असा सवाल राणे यांनी केला आहे. तर संजय राऊत हे सध्या शिवसेना प्रमुख असल्यागत वावरत आहेत असाही आरोप केला आहे. संजय राऊतांनी काल जी भाषा वापरली ती एका संपादकाच्या तोंडात शोभते का? मी तर म्हणतो हा पत्रकार नाहीच, संपादक नाहीच!

संजय राऊत शिवसेनेत येण्याआधी जेव्हा लोकप्रभाला होते तेव्हा त्यांनी बाळासाहेबांच्या विरोधात अनेक लेख लिहिले. बाळासाहेबांची मुलाखतही घेतली. त्यांनी काय काय लिहीले आहे हे मी पत्रकार परिषदेत सांगू शकत नाही. कारण कौटुंबिक प्रश्न आहेत. तेव्हा बाळासाहेबांनी संजय राऊतांबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतना बाळासाहेब म्हणाले, ‘तुम्ही शिवसेनेत दोन नेत्यांमध्ये आग लावायचे धंदे करत असतात. शिवसेना बद्दल वरवर प्रेम दाखवायचे आणि वाटेल ते लिहायचे. तुम्ही लाचार पत्रकार शरद पवारांची सत्ता असताना त्यांच्याकडे जाल आणि माझी सत्ता आल्यावर माझ्याकडे याल’ असे बाळासाहेब संजय राऊतबद्दल बोलले असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

अजित डोभाल यांच्या घरात शिरली एक अज्ञात व्यक्ती

संत रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी भजनात रमले

मोहित कंबोज म्हणतात, म्हणून संजय राऊत यांना घाम फुटला!

‘२५ हजार कोटींचा घोटाळा झाला म्हणताय, मग तुम्ही काय दोन वर्ष झोपला होता का?’

प्रवीण राऊतने ईडीला मुलाखत दिल्यानंतर संजय राऊत यांचा थयथयाट का सुरू झाला? असे काय आहे? जर असे भाजपावर आरोप करतात तर ते पुरावे का देत नाही? पाटकर यांच्या नावावर संजय राऊत व्यवहार करतात. संजय राऊत यांचा पाटकरांची काय संबंध? दुसऱ्यांना प्रश्न विचारण्या आधी, तुला विचारलेल्या प्रश्नाची उत्तर दे’ असा घणाघात राणेंनी केला आहे.

संजय राऊत यांना शिवसेनेचे काही पडलेली नाही त्यांचा डोळा उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे गंभीर असा आरोप राणे यांनी केला आहे. तर राऊत यांची पूर्ण कुंडली आपल्याकडे असून ती कुंडली काढेन असेही राणे यांनी सांगितले. मुख्यमंत्रीपदासाठी पवारांच्या सोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे आदित्य सोबत हा होता म्हणजे त्यांना नाहीतर मला ही याची वृत्ती आहे असा हल्लाबोल राणे यांनी केला.

संजय राऊतांना जेव्हा सुरुवातीला पहिल्यांदा खासदारकीची कमिटमेंट दिली आणि जेव्हा खासदारकी आली तेव्हा ती प्रितीश नंदीला देण्यात आली. तेव्हा बाळासाहेब आणि उद्धव यांचे कपडे उतरवेन असे संजय राऊत म्हणाला होता असा गौप्यस्फोट नारायण राणे त्यांनी केला आहे. माझ्याकडे त्याचा साक्षीदारही आहे सांगेन तेव्हा तो मीडिया समोर येईल असेही राणे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा