कोकणच्या दृष्टीने आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज, शनिवार ९ ऑक्टोबर रोजी कोकणातल्या सिंधुदुर्ग येथील बहुप्रतीक्षित अशा चिपी विमानतळाचे लोकार्पण होणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडणार आहे. दुपारी १२.३० वाजता या विमानतळाचे लोकार्पण केले जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित राहणार आहेत. ठाकरे आणि राणे हे दोघेही एकाच व्यासपीठावर असल्यामुळे या उद्घाटन प्रसंगी राजकीय टोलेबाजी पहायला मिळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
चीनी गारठले; कमांडरच्या मृत्युमुळे पूर्व लडाखमधील भयंकर थंडीची झाली जाणीव!
रतन टाटांनी केले मोदी सरकारच्या धोरणांचे कौतुक
वसुली म्हटली की ‘ससा’ आणि शेतकऱ्यांना मदत म्हटल्यावर ‘कासव’…असे हे ठाकरे सरकार!
अफगाणिस्तानात शिया मशीद बॉम्बस्फोटात ५० बळी
दरम्यान चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून आधीच राजकीय वाद पेटल्याचे दिसून आले आहे. उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर टाकण्यात आले आहे. यावरूनच राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शुक्रवार, ८ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत बोलताना राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे. माणसाने किती संकुचित असावे हे यातून दिसते असे राणे यांनी म्हटले आहे
तर या विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना अद्याप निमंत्रणच देण्यात आले नसल्याचे समजत आहे. त्यामुळे चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून राज्यात राजकीय कलगीतुरा रंगणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.