नाणारला तळा अथवा जयगडचा पर्याय

नाणारला तळा अथवा जयगडचा पर्याय

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) नाणार ऐवजी रायगड जिल्ह्यातील तळा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील जागांचा पर्याय तेल शुद्धीकरण कारखान्यासाठी सुचवला आहे.

या जागांची एमआयडीसीने प्राथमिक पाहणी केली आहे. या पाहणीनुसार या प्रकल्पासाठी सुमारे ९,००० एकर जमिन उपलब्ध होऊ शकते. त्याशिवाय प्रकल्पासाठी निवासी भाग सुद्धा यापासून थोड्याच अंतरावर निर्माण केला जाऊ शकतो. एमआयडीसी लवकरच त्यांचा अधिकृत अहवाल सरकारकडे सोपवणार आहे. त्यानंतर सरकार त्यावर उचित कारवाई करू शकेल.

हे ही वाचा:

सचिन वाझे यांच्यासोबत आणखी काही अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्यता?

उर्दू भवनासाठी शिवसेनेचा पुढाकार

सुशांतच्या प्रकरणातील गुपितांमुळे वाझेंचा बचाव?

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जागा उपलब्ध असल्याने तो प्रश्नच उद्भवत नाही. फक्त सरकारने याला परवानगी दिली पाहिजे. त्यानंतर राज्य सरकार केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाशी तळा आणि जयगड येथील जागेच्या उपलब्धतेविषयी चर्चा सुरू करू शकते. मात्र नाणार येथून प्रकल्प तळा किंवा जयगडला हलविण्याचा निर्णय केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय आणि आयओसीएल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या रत्नागिरी रिफायनरी ॲंड पेट्रोकेमिकल्स लि. या दोघांचा असेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाणार प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर तो विषय संपल्यात जमा असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर या दोन जागांचा विचार चालू असल्याचे समोर येत आहे. या अजस्त्र प्रकल्पाची क्षमता दरवर्षी ६० मिलियन टन इतक्या तेल शुद्धीकरणाची आहे.

मात्र तरीही, रत्नागिरी रिफायनरी ॲंड पेट्रोकेमिकल्स लि.(आरआरपीएल) या कंपनीने अजूनही नाणारच्या जागेची आशा सोडलेली नाही. आरआरपीएल या कंपनीने नाणार प्रकल्पाबाबत विविध माध्यमांतून जनजागृती करायला सुरूवात केली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय आणि आरआरपील दोघांनाही राज्य सरकराकडून याबाबत काही निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे.

प्रकल्प नाणार वरून हलविणे महागात पडणार आहे. प्रकल्प नाणारवरून तळा अथवा जयगडला नेणे वेळखाऊच नाही, तर आर्थिक दृष्ट्या देखील अडचणीचे आहे. यामुळे प्रकल्पाची किंमत ₹२ लाख कोटींनी वाढून प्रकल्पाचा आर्थिक ताळेबंदच कोलमडण्याची भिती निर्माण झाली आहे.

 

Exit mobile version