“नथुरामने गांधींचा ‘वध’ केला”

“नथुरामने गांधींचा ‘वध’ केला”

आजच्याच दिवशी नथुराम गोडसे याने गांधीजींचा ‘वध’ केला असे विधान महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. महात्मा गांधींच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाषण करताना त्यांनी नथुराम गोडसेने गांधीजींचा वध केला असा उल्लेख केला आहे. पटोले यांच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेस नेते नाना पटोले हे कायमच त्यांच्या बेताल वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह टिपणी करण्याचा सपाटा लावला होता. त्यावरतूनही राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. तो वाद शांत होतो न होतो तेच पटोले यांचे महात्मा गांधीबद्दलचे आक्षेपार्ह वक्तव्य समोर आले आहे आणि ते देखील गांधी पुण्यतिथीच्या दिवशी.

हे ही वाचा:

मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाने गमावला पाय

‘संजय राऊत यांची वाइन उद्योगात मोठी गुंतवणूक’

भारतातील ७५% प्रौढ नागरिक लसवंत

…तर वायनरी त्यांच्या नावावर करायला तयार!

नाना पटोले यांनी गांधी पुण्यतिथीच्या दिवशी भाषण करताना नथुराम गोडसेने गांधीजींचा ‘वध’ केला असे विधान केले आहे. यावेळी नाना पटोलेंनी नथुरामला भारतातील पहिला आतंकवादीही म्हटले आहे. पण यावेळी नानांनी वध हा शब्द वापरल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वध हा शब्द वाईट व्यक्तीच्या किंवा असुर प्रवृत्तीच्या माणसाच्या हत्येसाठी वापरला जातो. तो शब्द गांधीजींच्या बाबत नथुराम गोडसेचे समर्थक वापरताना दिसतात. पण आता स्वतःला गांधी समर्थक म्हणवणाऱ्या पटोलेंनीच हा शब्द वापरल्याने त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे.

Exit mobile version