“नाना पटोलेंचं आंदोलन राज्य सरकारच्याच विरोधात”

“नाना पटोलेंचं आंदोलन राज्य सरकारच्याच विरोधात”

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा म्हणजे निव्वळ फार्स आहे. राज्य सरकारने स्वतः पेट्रोल-डिझेलवर तब्बल २७ रुपये कर लावला आहे. महाराष्ट्र हे सर्वाधिक पेट्रोल दर असलेल्या राज्यांपैकी एक आहे, असे सांगत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल-डिझेलवरील कराचं कोडं सोडवलं. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस बोलत होते.

“इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा म्हणजे निव्वळ फार्स आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर हे गुजरातसह नऊ राज्यांच्या तुलनेत दहा रुपयांनी अधिक आहेत. काही ठिकाणी पेट्रोल पाच-सात रुपयांनी स्वस्त आहे. देशातल्या सर्वाधिक पेट्रोलचे भाव असणारा राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे.” असा खुलासा फडणवीसांनी केला आहे.

हे ही वाचा:

“नौटंकी बंद करा” देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला ठणकावले.

महाराष्ट्र सरकारने स्वतः पेट्रोल आणि डिझेलवर २७ रुपये कर लादलेला आहे. केंद्र सरकारचा एकूण कर ३३ रुपये आहे. ज्यामध्ये चार रुपये हे कृषी सेस, तर चार रुपये डीलर कमिशन आहे. उर्वरित पैशांपैकी ४२ टक्के पैसा केंद्र सरकार राज्यांना परत करतं. राज्य सरकारने मात्र 27 रुपये कर पेट्रोल-डिझेलवर लावलेला आहे. असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

“मला असं वाटतं की नाना पटोले यांचं आंदोलन हे राज्य सरकारविरोधात असावं. २७ रुपयांचा कर कमीत कमी करावा किंवा इतर राज्यांप्रमाणे किमान दहा रुपयांनी पेट्रोल डिझेल स्वस्त करावं, यासाठी त्यांचं आंदोलन असावं.” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Exit mobile version