विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र काँग्रेसचे नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राज्यात चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन आणि ‘खिलाडी’ अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही, सोबतच त्यांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्षितही होऊ देणार नाही असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. भंडारा येथे बोलताना पटोले यांनी हा इशारा दिला आहे.
“आज पेट्रोल,डिझेल दरवाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात अमिताभ आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून टिव टिव करायचे. युपीए सरकारवर टीका करायचे. शेतकऱ्यांच्या बाजुने बोलत होते पण त्यांना आता त्याच्या विसर पडला आहे.” असे पटोले आपल्या भाषणात म्हणाले.
हे ही वाचा:
“देशातील प्रश्नावर बोलण्याचा अक्षय कुमारला बोलण्याचा अधिकार नाही”- आव्हाडांची मुक्ताफळे
केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात या अभिनेत्यांनी आपल्या भूमिका मांडाव्यात. जसे ते मनमोहन सिंह सरकारच्या काळात लोकशाही माध्यमातून भूमिका मांडायचे तशीच त्यांनी आताही मांडावी. जर त्यांनी भूमिका मांडली नाही तर त्यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण आणि प्रदर्शन महाराष्ट्रात होऊ देणारा नाही असे नाना पटोले म्हणाले.
राज्य कायद्याचे, पप्पा किंवा पप्पूचे नाही
पटोले यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी पटोले यांच्यावर हल्ला चढवला आहे. “राज्य कायद्याचे आहे पप्पू किंवा पप्पाचे नाही.” असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.
नाना पटोले काँग्रेस महाराष्ट्रात आणीबाणी लागू करणार आहे का? सत्ता तुमची असली तरी तुमची मनमानी चालणार नाही.
देश घटनेच्या चौकटीत आणि कायद्यानुसार चालतो, तुमच्या मर्जीवर नाही. राज्य कायद्याचे आहे पप्पा किंवा पप्पूचे नाही. @NANA_PATOLEhttps://t.co/u8aD1UBOWZ— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 18, 2021