चोंबडेपणा करू नका, संजय राऊतांना सुनावले!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची संजय राऊतांवर खरमरीत टीका

चोंबडेपणा करू नका, संजय राऊतांना सुनावले!

शरद पवारांच्या निवृत्ती घोषणेनंतर राजकीय परिस्थितीला वेगळं वळण मिळालं आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे उदाहरण देत वक्तव्य केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत मात्र निर्णय राहुल गांधींच घेतात, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. यावर काँग्रेस नेते आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राऊतांना चांगलेच सुनावले आहे.

“संजय राऊत यांनी आमच्या पक्षात लुडबूड करू नये. त्यांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत, अशी सणसणीत टीका नाना पटोले यांनी केली आहे. संजय राऊत यांनी चोंबडेगिरी थांबवावी. ते काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नाहीत. त्यामुळे त्यांनी आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या क्षमतेवर आणि गांधी कुटुंबाच्या प्रतिष्ठेबद्दल काहीही बोलू नये, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.

हे ही वाचा:

… म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकाराला विमानातून उतरवलं

संजय राऊत यांच्यापेक्षा शकुनी मामा बरा!

शरद पवार म्हणतात, बाळासाहेबांसमवेतची सहजता उद्धव ठाकरेंशी बोलताना नव्हती

राज्यातील वाघांची संख्या ३१२ वरून ३९० ..!

“राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत जाण्याची चूक करणार नाही. जर राष्ट्रवादी भाजप सोबत गेली तर आम्ही भाजपविरोधात लढू. भाजप विरोधात लढण्यासाठी जे आमच्या सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही पुढे जाऊ. महाविकास आघाडी स्थापन करताना शरद पवार सोनिया गांधीकडे गेले होते. सोनिया गांधी पवारांकडे आल्या नव्हत्या,” असं नाना पटोले म्हणाले.

Exit mobile version