महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद हे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपाने एकत्र येत परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसने, तर भाजपने उपाध्यक्षपद पदरात पाडून घेतले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या परिस्थितीला राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक ठिकाणी भाजपासोबत युती करून सत्ता स्थापन केलेली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा देखील केलेली आहे. या चर्चेनंतर देखील स्थानिक पातळ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशीच युती केल्याचे दिसले आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपशीच युती केली, असे सांगत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, म्हणूनच आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
राज्य सरकारचे वेळकाढू धोरण ओबीसी समाजासाठी घातक ठरते आहे
राणा दाम्पत्याची पुन्हा एकदा हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा
राजद्रोहाच्या सर्व खटल्यांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती!
आशियाई निवडणूक प्राधिकरण संघटनेच्या (एएईए) अध्यक्षपदी भारत!
यापूर्वीही महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद समोर आलेले आहेत. निधी वाटप किंवा इतरही काही मुद्द्यांवरून असलेले वाद समोर आले आहेत. आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीच थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आणि त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे