‘विदर्भातील राष्ट्रवादीचे दुकान बंद व्हायला किती वेळ लागतो’

‘विदर्भातील राष्ट्रवादीचे दुकान बंद व्हायला किती वेळ लागतो’

नाना पटोलेंचा राष्ट्रवादीला घराचा आहेर

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सरकारमधीलच आपल्या मित्रपक्षांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. बुलडाण्यात बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादीवर टीका करत खोचक टोला लगावला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे दुकान बंद व्हायला वेळ लागणार नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

‘पंढरपूरची जागा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिंकता आली नाही. तिथे सगळे महान नेते बसले होते. राष्ट्रवादीचं तिकीट देऊनही पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे दुकान बंद होते. विदर्भात म्हणजेच बुलडाण्यात तर यांचे एकच दुकान आहे. विदर्भातील हे दुकान बंद व्हायला किती वेळ लागतो,’ असे नाना पटोले म्हणाले. तसेच पुढे माध्यमांशी बोलताना या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना राष्ट्रवादीचे दुकान विदर्भात नाही, हे इथल्या जनतेने अनेकवेळा सांगितलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे इथे दुकान आहे, हे म्हणणे चुकीचे आहे, असे स्पष्टीकरण पटोले यांनी दिले.

हे ही वाचा:

बाबासाहेब पुरंदरेंवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शिवप्रेमींची बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनाला अलोट गर्दी; राजकीय नेत्यांनीही घेतले दर्शन

बाबासाहेब त्यांच्या साहित्यातून कायमच जिवंत राहतील

कार्तिकी एकादशीला माऊलीची आणि लेकरांची भेट होणार…

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला होता. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे बडे नेते, मंत्री यांनी येथे बैठकांचा सपाटा लावला होता. मात्र मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता. तर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय झाला होता. या पराभवाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. याच पराभवाचा दाखला दात नाना पटोले यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला.

Exit mobile version