नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा

नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळेंकडे सोपवला राजीनामा. नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होणे जवळपास निश्चित.

गेले अनेक दिवस काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा नाना पटोलेंकडे जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळांमध्ये होती. नाना पटोले हे २०१९ मध्ये विधानसभा अध्यक्ष निवडले गेले होते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उपमुख्यमंत्रीपद आणि काँग्रेस पक्षाकडे विधानसभा अध्यक्षपद आलेले होते.

१९९९ ते २०१४ पर्यंत ते काँग्रेस पक्षाकडून आमदार होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले हे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढले आणि जिंकून आले. भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन मंत्री प्रफुल्ल पटेल यांना हरवले होते. परंतु नाना पटोले यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात आले नाही. २०१८ मध्ये पाटोळे यांनी लोकसभेचा राजीनामा दिला आणि ते पुन्हा काँग्रेस पक्षात गेले.

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार बनल्यावर पाटोले विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले होते. परंतु आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्यामुळे नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

Exit mobile version