काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज बुलडाणा जिल्ह्यात दौऱ्यावर होते. दरम्यान शेगाव येथून खामगावकडे येत असताना त्यांनी रस्त्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रश्न अद्याप मार्गी लागत नसल्याने त्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे.
नाना पटोले यांनी आपण खुर्चीत असतो तर एसटी आंदोलन इतके दिवस चालले नसते, असे कर्मचाऱ्यांना सांगितले. यावर कर्मचाऱ्यांनी आता ही आपण सत्तेत आहात त्यामुळे आपण हे करू शकता, असा प्रतिप्रश्न पटोले यांना केला. यावर पटोले म्हणाले, ‘आम्ही सत्तेत असलो तरी आमची सत्तेतील आस का आहे हे तुम्हाला चांगले माहीत आहे? यावरुन काँग्रेस नेमकी सत्तेत कशासाठी आहे?’ असे वक्तव्य केले. एकप्रकारे नाना पटोले यांनी महाविकास आघाडीवरील त्यांची नाराजी व्यक्त केली.
हे ही वाचा:
दिवंगत ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या पत्राबद्दल काय म्हणाले मोदी?
…म्हणून भोजपुरी अभिनेत्रीने केली गळफास लावून आत्महत्या
२ किलो आरडीएक्सने घडविला होता लुधियाना न्यायालयात स्फोट
गेल्या दीड महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या म्हणून त्यांनी संप पुकारला होता. कर्मचाऱ्यांनी हा संप मागे घ्यावा यासाठी राज्य सरकारने त्यांना वेळ दिली होती. ती वेळ गुरुवारी संपली असून शुक्रवारपासून कामावर हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यास एसटी महामंडळाने सुरूवात केली आहे.