राज्यातील साखर कारखान्यांना वाचवणारे केंद्र सरकार हे सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात अडचणी निर्माण करेल अशी तक्रार करणे निरर्थक आहे. सहकार क्षेत्रात अधिक कोणत्या प्रकारची सहाय्यता केली जाऊ शकते यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालय स्थापन केले आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. तर या वेळी बोलताना त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राष्ट्रीय पातळीवर जसे एक पप्पू आहेत तसेच महाराष्ट्रात नाना पटोले पप्पू आहेत. त्यांच्या मनात जे येते तेच ते बोलतात असे म्हणत चंद्रकांत दादा पाटील यांनी टोलेबाजी केली आहे.
शनिवार, १० जुलै रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. संजय राऊत यांना सहकार बद्दल काय माहिती आहे हाच एक प्रश्न आहे अशी सणसणीत चपराक चंद्रकांत पाटील यांनी लगावली आहे.
हे ही वाचा:
ओबीसी इम्पिरिकल डेटाचे सर्वेक्षण करणार ‘कलेक्टर’; मग केंद्र काय करणार?
बैलगाडीलाही पेलवेना काँग्रेसचा भार
‘टीका वाली नाव’…बिहारमधले अनोखे लसीकरण केंद्र
‘ठाकरे सरकारने राज्यात आणखी एक २६/११ घडवण्याची सुपारी घेतली आहे का?’
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच साखरेचे न्युनतम विक्री मूल्य सुनिश्चित करून मोदी सरकारने देशभरातील साखर कारखान्यांना वाचवले आहे. यामुळेच राज्यातील साखर कारखाने ही वाचले आहेत. सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या साखर कारखान्यांना मोदी सरकारने आर्थिक सहाय्य देत पॅकेज जाहीर केले.
देशात साखरेचे उत्पादन झाल्यावर साखर कारखान्यांना वीस टक्के इथेनॉल वापरण्याची परवानगी देणारा निर्णय हादेखील साखर कारखान्यांना काढणार आहे. अशाप्रकारे राज्यातील साखर कारखान्यांना वाचवणारे केंद्र सरकार हे सहकार क्षेत्रात अडचण निर्माण करेल ही एक विनाकारण केलेली निरर्थक तक्रार आहे असे चंद्रकांत दादा पाटील म्हणाले.