व्हाय आय किल्ड गांधी चित्रपटावर बंदीची मागणी

व्हाय आय किल्ड गांधी चित्रपटावर बंदीची मागणी

सध्या राज्यात व्हाय आय किल्ड गांधी (Why I killed Gandhi) या चित्रपटावरून राजकारण तापले आहे. या चित्रपटावरून राजकीय वर्तुळात सध्या दोन गट दिसून येत आहेत. आता या वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उडी घेतली असून या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

महात्मा गांधींची हत्या झाली याच दिवसाचे औचित्य साधून कडव्या विचाराचे चित्रपट निर्माता ‘Why I killed Ganghi’ हा चित्रपट प्रदर्शित करू पाहत आहेत. महात्मा गांधी यांच्या विचाराने संपूर्ण जग प्रभावित आहे. भारत देशाची ओळख महात्मा गांधी यांच्या नावाने होते. संपूर्ण जगभर ते परम पूजनीय आहेत. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचा दिवस एकता, जातीय सलोखा, अहिंसा आणि शांतता दिवसून म्हणून संपूर्ण जगभर पाळला जातो. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या शस्त्रांचा वापर करून जग जिंकता येते हे गांधींनी आपल्या लढ्यातून दाखवून दिले आहे. अशांतता, द्वेश, आणि हिंसक वृत्तीचे प्रदर्शन करणारा Why I killed Ganghi हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामुळे फॅसिस्ट वृत्तीला बळ मिळेल, असे पत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा:

श्रीनभ अग्रवालला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार

जगात ठरली भारताची काकडी श्रेष्ठ…

जगात ठरली भारताची काकडी श्रेष्ठ…

कर्नाटकच्या शाळेत नमाज पढण्याचे प्रकरण तापले… हिंदू संघटनांचे चौकशीचे आदेश

हा चित्रपट राज्यात कोणत्याही चित्रपटगृहात आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रतिबंध करण्याबाबत काँग्रेस पक्षाची मागणी असून ती मान्य करण्यात यावी, ही विनंती काँग्रेसने पत्रात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मुद्द्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रपटावरून राष्ट्रवादीतही दोन गट दिसून आले. राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाला विरोध केला. तर ती केवळ अभिनयाची भूमिका आहे. अमोल कोल्हे यांनी भूमिका साकरली म्हणन नथुरामच्या विचारांचे समर्थन होत नाही, अशी प्रतिक्रिया काही नेत्यांनी दिली.

Exit mobile version