बाळासाहेब थोरात नाराज ?

नाना पटोलेंवरून विसंवाद

बाळासाहेब थोरात नाराज ?

शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेस ने जागा गमावल्यानंतर आता पक्षात विसंवाद सुरु आहे. महाराष्ट्रातील हा वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटवण्याची मागणी होत आहे. सत्यजित तांबे यांच्यावरून सुरु झालेला वाद आता हा पक्षात सुरु असलेला गलिच्छ राजकारणाचा एक भाग असल्याचे , थोरात यांचे म्हणणे आहे. आपण आपला भाचा सत्यजित तांबे यांच्याबरोबर राहणार असून याबाबत दिल्ली हायकमांड याप्रकरणी निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र काँग्रेस मध्ये सर्व काही ठीक नाही कारण सत्यजित तांबे यांच्या बंडाची चर्चा दिल्लीपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. आणि त्याचवेळेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची हकालपट्टी करण्याची मागणी आता जोर धरत आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही पक्षातील अंतर्गत वाद , कलह यावर भाष्य केले आहे. मात्र त्याचवेळेस त्यांनी कोणतेच भाष्य केलेले नाही. किंवा कोणत्याच नेत्याचे नाव घेतले नाही. एकीकडे नाना पटोले मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळत आहेत. माध्यमांत आलेल्या बातम्यांनुसार काँग्रेस पक्षाच्याच नेत्याने सांगितले कि पटोले आपल्या सोबत पक्षाला घेत नाहीत. आपल्या पक्षातील इतर नेत्यांना ते बाजूला सारतात. भाजप पेक्षा त्यांचे काँग्रेस कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी पक्षातील लोकांबरोबर जास्त वाद झाले आणि तांबे प्रकरणामुळे ते सर्व चव्हाटयावर आले.

हे ही वाचा:

पी. चिदंबरम यांच्या पत्नीची संपत्ती ईडीकडून जप्त

मध्य रेल्वे मार्गावर रविवार ५ फेब्रुवारीला मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळ…

अजितदादांच्या मते उद्धव ठाकरेंमुळे सरकार कोसळलं?

सॅमसंगचे आता भारतातच ‘स्मार्ट’ उत्पादन

तांबे नुकतेच अपक्ष उमेदवार म्हणून नाशिक विभागांत यशस्वी झाले आहेत. या निवडणुकीच्या विजयानंतर त्यांनी शनिवारी पटोले यांना घेराव घातला. पटोले यांनी तांबे आणि थोरात कुटुंबाविरुद्ध कट रचल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केला. त्यांना पक्षातून काढून टाकण्यासाठी आणि कुटुंबाची बदनामी करण्यासाठी खोटे ए आणि बी फॉर्म पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. .थोरातांनी या सर्व प्रकारावर कोणतेही नाव न घेता सांगितले की, पक्षांतर्गत चालू असलेले राजकारण मला अस्वस्थ करणारे आहे. काही लोक आमच्याबद्दल चुकीचे राजकारण करून चुकीची माहिती पसरवत आहेत. आणि आम्ही भाजपमध्ये सामील होत आहोत असे सुद्धा सांगत आहेत.

जी काँग्रेस ची विचारधारा आयुष्यभर पाळत आलो ती पुढे सुद्धा तशीच चालू ठेवणार या सर्व बाबी मी दिल्लीमध्ये पक्ष नेतृत्वा ला सुद्धा कळवल्या असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असा विश्वास मला आहे.
दरम्यान काँग्रेस अध्यक्ष पटोले यांना हटवणे सोपे नसल्याचे काँग्रेस नेते बोलत आहेत . पक्षाच्या काही नेत्यांच्या मते भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्र टप्प्यात काँग्रेस अध्यक्षांनी वायनाड चे खासदार राहुल गांधी यांच्यासमोर स्वतःची प्रतिमा तैयार केली आहे.

 

Exit mobile version