खोट्या बातमीचा आधार घेत नाना पटोलेंची भाजपावर टीका

खोट्या बातमीचा आधार घेत नाना पटोलेंची भाजपावर टीका

आज महाराष्ट्रात आर्यन खान याला क्लीन चिट देण्यात आल्याची खोटी बातमी चांगलीच व्हायरल झाली आहे. या बातमीची सध्या चांगलीच चर्चा असून त्या बातमीच्या आधारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर करून ब्लॅकमेलिंग करणे हा भाजपाचा धंदा असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. ठाणे येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आर्यन खान प्रकरणात भाजपाने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचे स्पष्ट होते असे पटोले यांनी म्हटले आहे. आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात अडकवण्यात आले असा दावा पटोले यांनी केला आहे. तर आर्यन खानचा ड्रग्स प्रकरणाशी काहीच संबंध नव्हता असे एसआयटीने दावा केल्याचा खोटा दावाही पटोले यांनी केला आहे.

हे ही वाचा:

‘मविआ सरकार राज्याच्या इतिहासातील सर्वात भ्रष्टाचारी सरकार’

ॲपलने रशियामध्ये उत्पादनांची विक्री थांबविली, इतर सेवाही केल्या मर्यादित

आर्यन खानला क्लीन चिट हा PR चा फंडा

संजय राऊतांना पुरावे समोर आणायला मुहूर्त मिळेना

दरम्यान आर्यन खान याला किल्न चिट दिल्याचा दावा खोटा असल्याचे एनसीबीच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज आढळले नसल्याचे वृत्त खोटे आहे. या वृत्ताला एनसीबीकडून अधिकृत दुजोरा नसल्याचे एनसीबी डीडीजी संजय सिंग यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून यावर इतक्यात भाष्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

एनसीबीने केलेल्या या दाव्यामुळे पाटोळे यांच्या आरोपांमधील हवाच निघाली आहे. मुळात आर्यन खान याला क्लीन चिट मिळाल्याचे वृत्तच खोटे असल्यामुळे नाना पटोले यांनी भाजपावर केलेलूया आरोपांना कोणताही आधार उरत नाही.

Exit mobile version