काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे पटोले यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
जगभरासह भारतात सध्या पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल वरील कर कमी केला. यानंतर अनेक राज्य सरकारांनी पेट्रोल-डिझेल वरील करात कपात केली. पण महाराष्ट्र बंगाल केरळ अशा राज्यांत नागरिकांना कोणताही दिलासा दिला नाही. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सरकारांचे कान टोचले आहेत. तर या राज्यांनी नागरिकांना कर कपात करून दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत फक्त सत्तेचे ‘भोगी’
‘५७ कोटींचा आरोप पण, ५७ पैशांचा पुरावा देऊ शकले नाही’
काय अर्थ आहे शनीच्या कुंभ राशीप्रवेशाचा ?
योगींच्या आदेशावरून ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवले
पण असे असले तरी उद्धव ठाकरे यांचे सरकार आपणच कसे बरोबर आहोत हे दाखवत केंद्र सरकारकडेच बोटे दाखवत आहेत. त्यासाठी जीएसटी थकबाकीचा मुद्दा पुढे केला जात आहे. तर आता महाविकास आघडी सरकारमधलेच नेते राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. नाना पटोले यांनी महाराष्ट्र सरकारने इंधनाच्या किंमती कमी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे म्हटले आहे. त्यामुळे आता पेट्रोलवरून महाराष्ट्राचे राजकारण आणखीन तापणार की ठाकरे सरकार महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.