‘नमो महारोजगार मेळावा’ म्हणजे तरुणांच्या हाताला काम देण्याचा उपक्रम

‘नमो महारोजगार मेळावा’ म्हणजे तरुणांच्या हाताला काम देण्याचा उपक्रम

बारामतीमध्ये ‘महा रोजगार मेळावा’ संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे ही उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था विस्तारित करत १० व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आणली आहे. येणाऱ्या तीन ते चार वर्षात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्यात येणार आहे. यासाठी प्रशिक्षित मानव संसाधन गरजेचे आहे म्हणूनच कौशल्य प्रशिक्षणाचे मोठे काम शासनाने सुरु केले आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरुणांना या माध्यमातून रोजगार देण्याचे काम आपण करणार आहोत. त्याची सुरुवात झाली आहे.

‘नमो महारोजगार मेळावा’ म्हणजे तरुणांच्या हाताला काम देण्याचा हा उपक्रम आहे. या महारोजागर मेळाव्याच्या माध्यमातून ५५ हजार पदे अधिसूचित करण्यात आली आहेत याचा अर्थ एकीकडे मानवसंसाधनाची गरज निर्माण झाली आहे. तरुणांना रोजगार हवा आहे. रोजगार देणारे आहेत, रोजगार घेणारे आहेत यांना एकत्रित आणणे गरजेचे होते. पश्चिम महाराष्ट्रात हा रोजगार मेळावा होत आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहे.

हे ही वाचा:

४ दिवसांत ४०० जेट, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये जमले खास सेलिब्रिटी!

२६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार, लश्कर-ए-तोयबाचा गुप्तचर प्रमुख चीमा याचा पाकिस्तानात मृत्यू!

देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत दररोज ३,५१६ कोटींची भर

युवराज सिंग नव्हे; जया प्रदा, अक्षय कुमार, सेहवाग यांच्या उमेदवारीसाठी भाजप प्रयत्नशील!

महाराष्ट्रात पहिला मेळावा हा नागपूरमध्ये घेण्यात आला. तेव्हा ११ हजार तरुणांना रोजगार मिळाला. सुमारे ५० लाखापर्यंतचे पॅकेजेस मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला की, महाराष्ट्रभर मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिसूचित केलेली पद जास्त आणि अर्ज कमी आहेत. अजूनही अर्ज घेत आहोत. जे तरुण आले आहेत त्यांना त्यांच्या अभ्यासाप्रमाणे आणि कौशाल्याप्रमाणे रोजगार मिळेल. या निमित्ताने बारामतीमधील अनेक चांगल्या इमारतींचे उद्घाटन करण्यात आले. या इमारती शासकीय नसून कार्पोरेट अशा तयार झाल्या आहेत. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version