टिपू सुलतानच्या नावावर उद्यानाचे नाव देण्याच्या प्रस्तावावरून भाजपा आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यातील संघर्ष आता अधिक चिघळणार असल्याचे चित्र आहे. आता भाजपनेही अंधेरी आणि देवनार येथील रस्त्यांना टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आल्याच्या प्रस्तावावर फेरविचार व्हावा, अशी भूमिका घेतलेली आहे. २०१३ मध्ये शिवाजी नगर येथील रस्त्याला टिपू सुलतान नाव देण्यात यावे असा ठराव होता.
१५ जुलैला गोवंडी येथील समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी बीएमसीमधील बाजार आणि उद्यान समितीच्या बैठकीत टिपू सुलतानच्या नावावर उद्यानाचे नाव ठेवण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला भाजपने विरोध केला आणि पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांनी हा प्रस्ताव नाकारायला हवा होता, अशी मागणी केली. त्यामुळेच आता या प्रस्तावावरून वादाची ठिणगी पडली आहे. परंतु समितीच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे सेनेच्या नगरसेविका आहेत, त्यांनी हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवला, त्यात असे म्हटले आहे की उद्यान सध्या निर्माणाधीन आहे आणि त्याच्या नावावर आदेश काढणे खूप लवकर आहे. यानंतर भाजपने शिवसेनेवर या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याचा आरोप केला.
हे ही वाचा:
आयएनएस विक्रांतवर यशस्वीरित्या उतरवले हेलिकॉप्टर
ठाकरे सरकारने ‘भिंती’ उभारूनही राज्यपाल महाराष्ट्र दौऱ्यावर
सार्वजनिक स्थानांना नाव देण्याचा प्रस्ताव प्रथम प्रभाग समितीकडे जातो, त्यानंतर तो कार्य समितीकडे जातो. त्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी महामंडळाच्या सभागृहात जातो. अंधेरीतील गिल्बर्ट हिल परिसरातील रस्त्याला २००१ मध्ये तर शिवाजी नगर येथील रस्त्याला २०१३ मध्ये टिपू सुलतान यांचे नाव देण्याचा ठराव मांडण्यात आला होता, त्यावर फेरविचार करण्याची मागणी करणारे पत्र भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी महापौरांना दिले आहे. या पत्रामुळे पुन्हा एकदा नामकरणाचा वाद आता समोर आलेला आहे.