केसरकर, लोढा मुंबई शहर, उपनगरचे पालकमंत्री

केसरकर, लोढा मुंबई शहर, उपनगरचे पालकमंत्री

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे कोण पालकमंत्री बनणार याची चर्चा सुरु होतीच अखेर या चर्चेला विराम लागला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तीन महिन्यांनी शिंदे फडणवीस सरकराने जिल्ह्यांच्या नवीन पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. १९ जणांवर राज्यातील पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर एक दीड महिन्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. त्यानंतर जवळपास पुन्हा सव्वा महिना उलटल्यानंतर अखेर जिल्हानिहाय पालकमंत्र्यांचे वाटप जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नियोजन मंत्री म्हणून सहा जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्यावर सर्वाधिक सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर असणार आहेत. तसेच पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवली आहे.

राज्यातील इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे :

Exit mobile version