ड्रग्स माफिया ललित पाटील याच्या ड्रग्स रॅकेट प्रकरणात एकामागेएक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला अटक केल्यानंतर धक्कादायक खुलासे होत आहेत. आता या प्रकरणी ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. नाशिकमधील माजी महापौराचे नाव यात समोर आले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये एकीकडे ठाकरे गटाकडून दादा भुसे यांच्यावर आरोप केले जात असताना ठाकरे गटातील माजी महापौर विनायक पांडे यांचे नाव समोर आले आहे.
ललित पाटील ड्रग्स प्रकरणी नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. ठाकरे गटाचे नेते असलेले माजी महापौर विनायक पांडे यांना पोलीस चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. ललित पाटील याची अपघातग्रस्त गाडी दुरुस्त करण्यासाठी महापौर विनायक पांडे यांच्या चालकाने त्याला मदत केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. यामुळे या प्रकरणात पांडे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
‘अल जझिराचे युद्धावरील वृत्तांताचे प्रमाण कमी करा’
हमासच्या चुकीचा फटका गाझातील पत्रकाराला बसला; इस्रायलच्या बॉम्बवर्षावात कुटुंब मृत्युमुखी
कतारने ठोठावली भारतीय नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा!
पोर्तुगीजांनी तोडली होती एक हजार मंदिरे; गोवा सरकारने बनवला मास्टर प्लॅन
या प्रकरणात नाव आल्यानंतर आपण कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे विनायक पांडे यांनी स्पष्ट केले आहे. राजकीय जीवनातून उठवण्याचा डाव असल्याचा आरोप विनायक पांडे यांनी केला आहे. एकीकडे ललित पाटील प्रकरणात ठाकरे गट सातत्याने मंत्री दादा भुसे यांचे नाव घेत आहे. तर, आता चौकशीतून ठाकरे गटाच्या नेत्याचे नाव समोर आले आहे.