बारामती मतदारसंघाची सुरस वाढणार राजमाता जिजाऊ यांचे थेट चौदावे वंशज व शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक इतिहास संशोधक थोर व्याख्याते व अमेरिका येथे संपन्न झालेल्या जागतिक सर्व धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधी म्हणून गेलेले व तरुणांसाठी उद्योजकतेचे धडे देणारे बारा लाख तरुणांना उद्योजक बनवण्याचे ध्येय बाळगणारे प्राध्यापक नामदेवराव जाधव यांची ३५- बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी भक्ती शक्ती शिल्प या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज यांना पुष्प अर्पण करून दिवसाची सुरुवात करत अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्यासह सर्व महापुरुषांना वंदन करत कौन्सिल हॉल पुणे या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
हे ही वाचा:
काँग्रेसच्या काळातील कामकाज म्हणजे ‘बारशाला गेला आणि बाराव्याला आला’
मुंबईचा पैसा, लखनौची जमीन, ठाकरेंच्या नावाने गलका…
छगन भुजबळांची नाशिकमधून माघार, गोडसेंचा मार्ग मोकळा!
‘संपूर्ण जगाने पाहिली आहे मोहम्मद शमीची कमाल’
देशाचे लक्ष लागून असलेल्या चुरशीच्या बारामती लोकसभा मतदार संघातील ही लढत ही दुरंगी नसून तिरंगी असेल याची कल्पना देत आपण बारा मावळ परिसरातील राजगड, तोरणा, पुरंदर, सिंहगड यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील अनेक किल्ल्यांची दुरावस्था तरुणांच्या रोजगाराची समस्या महिलांच्या आर्थिक व सुरक्षेच्या समस्या पुरंदर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती त्याचप्रमाणे हे एकुणच स्वच्छ प्रशासन, छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेली स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात सुराज्य निर्माण करण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता नक्कीच मला लोकसभेत पाठवील अशी आशा जाधव यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जाधव यांनी आपली सडेतोड मते व्यक्त केलेली आहेत. आता या निवडणुकीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार यांच्या विरोधात ते लढणार आहेत.