प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी छत्रपती शासन या नवीन पक्षाच्या माध्यमातून २८८ उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे. हा पक्ष तरुण तडफदार उमेदवारांना निवडणुकीमध्ये सहभागी करणार आहे. पक्षाने उमेदवार निश्चितीसाठी ५ निकष ठेवले आहेत. उमेदवार ४० पेक्षा जास्त वयाचा नसेल, उमेदवारावर कोणताही गुन्हा दाखल नसेल, उमेदवार संविधान मानणारा असेल, उमेदवाराला छत्रपती शासन पक्षाबरोबर एकनिष्ठ असेल व छत्रपति शिवाजी महाराजांना मानणारा असेल हे पाच निकष उमेदवारी देताना पाळण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
भगव्या ध्वजाला नमन करत अतुल भातखळकरांच्या प्रचाराला प्रारंभ!
फटाके फोडण्यावरून भिलवाडामध्ये हिंसाचार
फरार झालेल्या काँग्रेस महिला नेत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट
बांगलादेशमध्ये सनातन जागरण मंचची भव्य रॅली
छत्रपती शासन हा पक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारा पक्ष असून यामध्ये कोणत्याही प्रकारच्या जातीभेद करण्यात येणार नाही. कोणत्याही उमेदवाराची या कार्यकर्त्यांची जात यामध्ये विचारात घेतली जाणार नाही काम करणारा व पक्षाचे निकष पाळणारा उमेदवार व कार्यकर्ता यांना या मध्ये नेहमीच मानाचे स्थान मिळेल मिळेल, अशी घोषणा प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. पत्रकारांशी संवाद साधताना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक आर्थिक विषयावरती सखोल सादरीकरण करण्यात आले
तसेच त्यांनी खालील ५ उमेदवार घोषित केले.
१. अविनाश पुजारी – खडकवासला विधानसभा
२. भाऊसाहेब मर्गळे भोर विधानसभा
३. अरविंद वलेकर – कसबा विधानसभा मतदारसंघ
४. अभिमान लोंढे माढा विधानसभा
५. बबन शेवाळे नाशिक
प्राथमिक स्वरूपामध्ये पाच उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली.
पक्षाला लवकरच निवडणूक चिन्ह मिळेल
असे पक्षाध्यक्षाने सांगण्यात आले