संपूर्ण नालासोपाऱ्याचे बिल एकाच व्यक्तीला?

संपूर्ण नालासोपाऱ्याचे बिल एकाच व्यक्तीला?

मुंबईनजीकच्या नालासोपाऱ्यात एका ८० वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला जवळपास ₹८० कोटींचे वीज बिल पाठवण्यात आले. नंतर ही लिखाणातील चूक असल्याचे समोर आले.

सोमवारी नालासोपाऱ्यात, पिठाची गिरणी चालवणाऱ्या ८० वर्षीय गणपत नाईक यांना महावितरणकडून ₹८० कोटींचे वीज बील पाठवण्यात आले. हे बील पाहून गणपत नाईक यांना आश्चर्याचा धक्का बसला. गणपत नाईक हे स्वतः हार्ट पेशंट आहेत, त्यामुळे हे बील बघून त्यांचा रक्तदाब वाढला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात न्यावे लागले.

हे ही वाचा:

वीजबिल वाढी विरोधात भाजपा करणार राज्यव्यापी आंदोलन

दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने (एमएसईडीसीएल) ही नकळत चूक असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर हे बिल दुरुस्तही करण्यात आले. महावितरणचे अधिकारी सुरेंद्र मोरेने यांच्यानुसार, “”एजन्सीने सहा आकड्यांऐवजी नऊ आकडी बिल तयार केले होते. आम्ही हे बिल पुन्हा तपासत असताना आणि दुरुस्त्या करत असतानाच एजन्सीने नाईक यांना हे बिल जारी केले. आम्ही त्यांच्या वीज मीटरचा अभ्यास केला आहे आणि त्यांना नवीन सहा आकडी बिल दिले आहे.” असे वीज मंडळाचे अधिकारी सुरेंद्र मोनेरे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात वीजबिल माफ करणार असे महाविकास आघाडी सरकारने सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र अशा पद्धतीने कोणतेही बिल माफ झाले नाही, उलट वाढीव वीजबिल भर अन्यथा कनेक्शन कापू, असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे.

Exit mobile version