गोवा निवडणुकीत विरोधक देव पाण्यात ठेवून बसले होते!

गोवा निवडणुकीत विरोधक देव पाण्यात ठेवून बसले होते!

देवेंद्र फडणवीस यांनी केला घणाघात

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा मोठा विजय झाला. या विजयाचा सोहळा देशात अनेक ठिकाणी साजरा केला जात आहे. गोव्याच्या निवडणुकीच्या विजयाचे श्रेय हे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे आहे. आज फडणवीस यांचे या यशामुळे नागपुरात जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले. आणि २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाच येणार असे फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे. शिवसेना आणि काँग्रेसचा झालेला पराभव यावरही फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, ” गोव्यात शिवसेनेला नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. आणि अनेक विरोधक निवडणुकीवेळी देव पाण्यात ठेवून बसले होते. त्याचा काहीही उपयोग झाला नाही,जनतेने त्यांना बरोबर उत्तर दिले आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर येत आहेत म्हणून आघाडी सरकार आमच्या नेत्यांविरोधात खोट्या केसेस दाखल करत आहे. मात्र आघाडीने कितीही खोट्या केसेस दाखल केल्या तरी त्यांचा बुरखा आम्ही फाडणार. मविआचे सर्व भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार. ही महाविकास आघाडी सरकार नाही तर महावसुली आघाडी आहे.”

गोव्यातील जनतेचे आभार मानत फडणवीस म्हणाले, “विधानसभेत झालेला विजय हा जनतेने दिलेले प्रेम आणि विश्वास आहे. जनतेने भविष्याचा आणि विकासाचा विचार करूनच भाजपाला मत दिले आहे.पंतप्रधान मोदींनी सामान्य जनतेत विश्वास निर्माण केला आहे. यामुळेच चार राज्यांत इतके यश मिळाले आहे . गोव्याच्या जनतेचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आणि आशीर्वाद आहेत. ”

“पंतप्रधान मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या २० हजार नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम मोदी सरकाने केले. कोरोना महामारीत देशाला कोरोनापासून मुक्ती देण्याचे काम मोदी सरकारने केले. यामुळेच जनतेने आम्हाला कौल दिला आहे” असंही फडणवीस म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

हिजाब प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आज मुस्लीम संघटनांचा ‘कर्नाटक बंद’

गोव्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास

‘एएसआय’ ला पोलीस आयुक्तांची होळीची खास भेट

जनरल बिपिन रावत यांच्या नावाने ‘चेअर ऑफ एक्सलन्स’

गोव्यात मिळालेल्या यशाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. गडकरी म्हणाले, गोव्याच्या निवडणुकीत अनेक होते शिवसेनाही यात सामील झाली होती. रोज प्रचार, मुलाखती देऊन भाजपाचा कसा पराभव होईल यासाठी प्रयत्न होते. मात्र तरीही या पक्षाचा दारुण परिणाम झाला. गोव्याच्या जनतेने जात, धर्म, भाषा, पंथ, पक्ष यापलिकडे भविष्यासाठी भाजपवर विश्वास दाखवल्याचे गडकरींनी म्हटले आहे.

Exit mobile version