नागपूरमधील प्रसिद्ध अशा नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी निधीचा प्रवाह सुरु होणार आहे. नागपूरचे सुपुत्र आणि केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला भारत सरकारच्या खर्च वित्त समितीने (ईपीसी) मान्यता दिली आहे.
नागपूर मधील नाग नदी ही महाराष्ट्राच्या उपराजधानीची एक महत्वाची अशी एक खास ओळख आहे. मुख्य शहरातून वाहणाऱ्या या नदीला ऐतिहासिक असे महत्व आहे. विशेष म्हणजे नागपूर शहराचे नावच या नदीच्या आधारे ठेवण्यात आले आहे. पण गेल्या काही वर्षांपासून नाग नदीचे होणारे प्रदूषण हा चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने देखील असे म्हटले होते की, वाढत्या शहरीकरणामुळे आणि कारखानदारीमुळे नाग नदी प्रचंड प्रदूषित झाली आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिकांविरोधात महिला आयोगातही तक्रार
चीनच्या नव्या सीमा कायद्यावर भारत नाराज
नवाब मलिक, एनसीबीसंदर्भातील तक्रारींची चौकशी करणार हे चार अधिकारी
नीरज चोप्रासह या ११ जणांना मिळणार खेलरत्न पुरस्कार
पण आता नाग नदीला केंद्र सरकारकडून नव संजीवनी मिळणार आहे. नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला खर्च वित्त समितीकडून मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या या मंजुरीनंतर आता तब्बल २,११७ कोटी रुपयांचे हे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. तर पुढील ८ वर्षांत हे काम पूर्ण होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत ९२ एमएलडी क्षमतेचे तीन एसटीपी प्रकल्प, तसेच ५०० किमी सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे जाळे, पंपिंग स्टेशन आणि सामुदायिक शौचालये बांधण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून दिली आहे