दिनांक १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषेदेतून सांगितले. परंतु आता नागपूरच्या हॉस्पिटलनेच शरद पवार आणि अनिल देशमुखांचे पितळ उघडे पाडले आहे. नागपूरचे अलेक्सिस हॉस्पिटल जिथे देशमुख यांना ऍडमिट करण्यात आले होते, त्या हॉस्पिटलने हे स्पष्ट केले आहे की, देशमुख यांना कोणत्याही प्रकारच्या क्वारंटाईनबद्दल सांगण्यात आले नव्हते.
अनिल देशमुख यांनी एक व्हिडिओ ट्विट करून असे सांगितले होते की, दिनांक ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान मला कोरोना झाला होता. त्यामुळे मी नागपूरच्या ॲलेक्सिस हॉस्पिटलमध्ये होतो. १५ तारखेला मला डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर बाहेर पडत असताना काही पत्रकार हॉस्पिटलच्या गेटवर उभे होते. त्यांना काही प्रश्न होते. मला थकवा असल्याने मी तिथे खुर्चीवर बसून काही प्रश्नांची उत्तरे दिली. नंतर गाडीतून होम क्वारंटाईनसाठी निघून गेलो. त्यानंतर थेट २८ फेब्रुवारी रोजी मी सह्याद्री या महाराष्ट्र सरकारच्या गेस्ट हाऊस वर एका मिटिंगला पोहोचलो. या शब्दांत त्यांनी खुलासा केला आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; संसदेत खासदारांची मागणी
रश्मी शुक्लांनीही उघड केला भ्रष्टाचार- परमबीर सिंह
मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी नार्को टेस्ट करावी; भाजपा आमदाराची मागणी
आज दुपारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना, शरद पवार यांनी देशमुखांच्या बचावाचा प्रयत्न केला. मात्र त्यांची परिषद पुर्ण व्हायच्या आतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी १५ तारखेच्या गृहमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ रिट्वीट केला होता. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी देखील, कोरोना काळात बाधित असताना संसर्ग पसरवल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली पाहिजे अशी भुमिका मांडली होती.
वा छान, असे खरं बाहेर काढले पाहिजे