फडणवीसांच्या प्रयत्नाने नागपूरला मिळाला ऑक्सिजन

फडणवीसांच्या प्रयत्नाने नागपूरला मिळाला ऑक्सिजन

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने नागपूरसाठी ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. रायपूर येथून हा ऑक्सिजन नागपूरला आणण्यात आला आहे. शनिवार,२4 एप्रिल रोजी हा ऑक्सिजन नागपूरला पोहोचला. हा ऑक्सिजन नागपूर मधील कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे.

देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दर दिवशी लाखो नागरिक या कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. याचा देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची कमतरता भासत आहे. कुठे रुग्णांना बेड्स नाहीयेत तर कुठे रेमडेसिवीर उपलब्ध होत नाहीयेत. देशभरात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचीही कमतरता भासत आहे. अशातच ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

हे ही वाचा:

मोदी सरकारने आणले ई-प्रॉपर्टी कार्ड, काय आहेत फायदे?

सिंगापूरमधूनही ऑक्सिजन वहनाचे टँकर्स

ऑक्सिजन पुरवठ्याशी निगडीत उपकरणांवरील आयात शुल्क माफ

…नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती- सुजय विखे पाटील

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर इथेही ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सुरु केलेली देशातील पहिली वहिली ऑक्सिजन एक्सप्रेस कालच महाराष्ट्रात दाखल झाली. त्याच्यामधूनही नागपूरला ऑक्सिजनचा पुरवठा झाला. तर आज म्हणजेच २४ एप्रिल रोजी नागपूरमध्ये रायपूरहून मागवण्यात आलेले ऑक्सिजनचे टँकर्स दाखल झाले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे ऑक्सिजन टँकर्स नागपुरात आले. या दोन टँकर्समध्ये मिळून ३८ मॅट्रिक टन इतका ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. याने नागपूरमधील ३००० पेक्षा अधिक बेड्सची ऑक्सिजनची गरज भागणार आहे. रायपूरहून अजून तीन टँकर्स नागपूरला येणार आहेत. नेको उद्योग समूह आणि जेएसडब्लू उद्योग समूह यांच्याकडून हे ऑक्सिजन टँकर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

Exit mobile version