24 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारणमुंबईला पुढे न्यायला भाजपा तत्पर

मुंबईला पुढे न्यायला भाजपा तत्पर

Google News Follow

Related

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला विजयी करण्याचा मानस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी बोलून दाखवला आहे. मुंबई येथे नड्डा यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मुंबईकरांनी महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचे मन बनवले आहे असे त्यांनी सांगितले. तर मुंबईला पुढे घेऊन जाण्यासाठी कोणता पक्ष तत्पर असले तर तो भारतीय जनता पार्टी आहे असे देखील ते म्हणाले.

गुरुवार, ११ नोव्हेंबर रोजी जे.पी. नड्डा यांचे मुंबईत आगमन झाले. यावेळी विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर नड्डा यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राष्ट्र असु दे, महाराष्ट्र असू दे किंवा मुंबई असू दे, यांना पुढे नेण्यासाठी तत्पर असणारा कोणता राजकीय पक्ष असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे असे नड्डा यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केले ‘न्यूज डंका’ च्या दिवाळी अंकाचे कौतुक

एसटीचे विलिनीकरण झाले तर वसुली कशी होईल?

महाराष्ट्रात लवकरच भाजपाचे सरकार

वक्फ बोर्डाशी संबंधितांवर छापेमारी होताच मलिकांचा मंदिर घोटाळ्याचा आरोप

यावेळी नड्डा यांनी भाजपा लवकरच महाराष्ट्रात सत्ता स्थापन करेल असे देखील सांगितले. ‘महाराष्ट्र में जल्द ही कमल का परचम लेहराएगा’ असे म्हणत राज्यात लवकरच भाजपाचे सरकार येईल असा हुंकार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी केला. राज्याचे राजकारण तापलेले असताना नड्डा यांचा हा मुंबई दौरा आणि मुंबईत येऊन त्यांनी दिलेला हा इशारा फारच महत्वाचा मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणीत जे.पी.नड्डा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडून फेकण्याची भाषा केली होती. तर त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच नड्डा यांनी पुन्हा एकदा भाजपचे सरकार महाराष्ट्रात येणार असल्याचे सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा