भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर उसळलेल्या हिंचारात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात आहेत. या सर्व कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची नड्डा यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. ‘बंगालच्या सत्ताधाऱ्यांचे रक्तरंजित राजकारण भाजपा सहन करणार नाही.’ असा इशारा नड्डा यांनी दिला आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर सुरु झालेल्या हिंसाचाराने देशाला हादरवून सोडले आहे. २ मे रोजी पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाले. त्या दिवसापासूनच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हिंसेला सुरुवात झाली. त्यानंतर पुढल्या दोन दिवसात या हिंसाचाराने आणखीनच भीषण रूप धारण केले. दुकाने लुटण्यात आली, भाजपा पक्षाची कार्यालये जाळण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. असंख्य भाजपा कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले झाले. सामूहिक बलात्काराच्या घटनाही समोर आल्या आहेत. आत्तापर्यंत १२ जणांची या हिंसाचारात हत्त्या झाल्याच्या बातम्या येत आहेत पण हा आकडा आणखीन जास्त असून शकतो असे म्हटले जात आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसही अपयशी होताना दिसत आहेत.
हे ही वाचा:
ठाकरे सरकार इम्तियाज जलील यांची मागणी मान्य करणार का?
बंगाल हिंसाचार: संजय राऊतांनी केली ममता बॅनर्जींची पाठराखण
बंगाल हिंसाचार: पंतप्रधान मोदींची राज्यपालांशी चर्चा
पवारांना पुन्हा पंतप्रधान पदाचे वेध
याच पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या दोन दिवसीय पश्चिम बंगालच्या दौऱ्याला सुरुवात झाली. या आपल्या दौऱ्यात त्यांनी तृणमूलच्या हिंसाचाराचा बळी ठरलेल्या भाजपा कार्यकर्त्यांना भेट दिली. याचवेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला.
नड्डा काय म्हणाले?
“बंगालच्या सत्तेत बसलेल्या लोकांचे रक्तरंजित राजकारण भाजपा सहन करणार नाही असा इशारा नड्डांनी दिला. भाजपा सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या सूत्रावर वाढत आहे. बंगालच्या जनतेचे राजकीय शोषण आम्ही सहन करणार नाही. ममता बॅनर्जी म्हणजे असहिष्णुतेचे मूर्तिमंत रूप आहेत. ममताजी निवडणूक जिंकल्यावर तुमच्या कार्यकर्त्यांनी जो तांडव केला आहे तो दाखवून देतो की तुम्हाला लोकशाहीवर किती विश्वास आहे.” असा घणाघात करताना “आमच्या कार्यकर्त्यांचे बलिदान वाया जाणार नाही.” असे आश्वासनही नड्डा यांनी दिले