26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणराष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा यांचे जंगी स्वागत

राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा यांचे जंगी स्वागत

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा गुरुवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाले. मुंबई प्रदेश भाजपाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत मुंबई विमानतळावर करण्यात आले. भारत माता की जयच्या घोषणा देत भाजपा कार्यकर्त्यांनी नड्डा यांचे स्वागत केले. भाजपा प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रदेश भाजपा सरचिटणीस श्रीकांत भारतीय, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे यावेळी उपस्थित होते. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन नड्डा यांचे स्वागत केले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अतुल भातखळकर यांनी नड्डा यांच्या आगमनामागील कारणमीमांसा आणि त्यांच्या कार्यक्रमाविषयी सांगितले. ते म्हणाले की, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांचे मुंबई भाजपाच्या वतीने आम्ही स्वागत केले. आसामच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचा अभ्यास वर्ग रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत सुरू होणार आहे. त्याचे उद्घाटन नड्डा यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम १२ ते १४ असे तीन दिवस चालणार आहे. त्यात नड्डा या आमदारांना मार्गदर्शन करतील. संघटन मंत्री पी.एल. संतोष, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील यावेळी मार्गदर्शन करतील.

 

हे ही वाचा:

 गुजरातमध्ये हस्तगत केलेल्या ३०० कोटींच्या ड्रग्सचे मुंब्रा कनेक्शन

पाकिस्तानला ‘वेड’ लागायचेच राहिले बाकी…

‘अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतात’

सलमान खुर्शीद यांनी पुन्हा उधळली मुक्ताफळं

 

सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना नड्डा यांचा हा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे. उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी नड्डा उपस्थित राहणार आहेत. नड्डा यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला उखडून फेकण्याची भाषा केली होती. त्यामुळे नड्डा यांच्या या मुंबई दौऱ्यात काही महत्वाच्या घडामोडी घडतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा