एडविनाचा गूढ मृत्यू आणि नेहरूंची पत्र

एडविनाचा गूढ मृत्यू आणि नेहरूंची पत्र

इतिहासाच्या गर्भात अशी अनेक काळी रहस्य (डार्क सिक्रेट्स) दडलेली असतात जी बाहेर येणे अनेकांसाठी त्रासदायक ठरते. ही अशी रहस्य बाहेर आली तर कदाचित इतिहासातील अनेक सन्माननीय व्यक्तिमत्वांची काळी बाजू जगासमोर येण्याची भीती असते. म्हणून ही रहस्य जाणीवपूर्णक लपवली जातात. त्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाते. त्यासंबधीची कागदपत्रे, पुरावे नष्ट केले जातात. साक्षीदार शांत केले जातात. यामुळे विषय थंड होईल असा समाज असतो. अपेक्षा तरी असतेच असते. पण तसे होत नाही.

चर्चा होणे थांबत नाही. दबक्या आवाजात कुजबुज सूरु होते आणि कालांतराने या गोष्टी उघड बोलायची हिम्मतही लोक दाखवू लागतात. जेतेच कायमी इतिहास लिहितात हा जगाचा नियम आहे. पण असे असले तरी पराभूतांची बाजू मांडणारा आवाज आणि ऐकणारे कान अस्तित्वातच नाहीत हा समज करून घ्यायचा नसतो. हा इतिहास झाकण्याचा, दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो वर डोकावण्यापासून राहत नाही. असाच इतिहास आहे पंडित जवाहरलाल नेहरू आणि माऊंटबॅटन दांपत्याचा! आजही या इतिहासाची कायम चर्चा होताना दिसते आणि इतिहासातून अनेक घटना डोकं वर काढण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

ब्रिटिशकालीन भारतात अनेक रंजक अशी व्यक्तिमत्वे होऊन गेली. इतिहासात जे काही मोजके ब्रिटिश अधिकारी फार उल्लेखनीय ठरले त्यातलेच एक म्हणजे भारतात व्हॉईसरॉय म्हणून असलेले लुईस माऊंटबॅटन! लुईस माऊंटबॅटन हे भारतात व्हॉईसरॉय या पदावर आलेले शेवटचे इंग्रजी अधिकारी. ब्रिटनकडून भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यानंतर ट्रान्स्फर ऑफ पॉवर अर्थात सत्तांतराची प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी याची देखरेख करण्याची जबाबदारी माऊंटबॅटन यांच्यावर होती. हे संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पदवी यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी त्यांना नेमण्यात आले होते.

डिकी या टोपणनावाने आपल्या परिवारात आणि मित्रमंडळींमध्ये प्रसिद्ध असलेले लुईस माऊंटबॅटन हे आपली पत्नी एडविना हिला घेऊन भारतात आलेले. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि माऊंटबॅटन दाम्पत्य यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. नेहरूंच्या उदारमतवादी धोरणाने आणि व्यक्तिमत्वाने माऊंटबॅटन चांगलेच प्रभावित होते.

पण हे संबंध इथपर्यंतच मर्यादित नसल्याची चर्चा तेव्हापासूनच रंगली होती जी आजपर्यंतही तशीच कायम आहे. नेहरू आणि एडविना माऊंटबॅटन यांच्यामधील संबंध नेमके काय होते याबद्दल बरीच कुजबुज रंगली होती. आजही या विषयावर अनेक लिखाण झाले आहे. अनेक इतिहासकारांनी, लेखकांनी या संदर्भातील खळबळजनक दावे केले आहेत. अशाच एका दाव्याची सध्या चर्चा सुरु आहे.

हे ही वाचा:

‘मातोश्री’ चरणी यशवंत जाधवांचे २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ

किरीट सोमय्या, निलेश राणे रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार

‘मन की बात’ मधून गोदावरी स्वच्छतेसाठी झटणाऱ्या नंदकिशोर यांचे कौतुक

चीनमधील त्या विमान अपघातात १३२ जणांचा मृत्यू

ब्रिटिश इतिहासकार अँड्र्यू लॉवनी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि एडविना माऊंटबॅटन यांच्या संदर्भात काही रंजक दावे केले आहेत. यामध्ये नेहरू आणि एडविना यांच्यातील नातेसंबंधावर थोडा अधिक प्रकाश पडतो. फर्स्टपोस्ट या इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधताना त्यांनी काही तथ्ये बोलून दाखवली. अँड्र्यू लॉवनी यांनी नुकतेच द माऊंटबॅटन्स: देअर लाईव्ह्स अँड लव्ह्स नावाचे पुस्तक लिहीले आहे. या पुस्तकासाठी त्यांनी अनेक पत्रे, डॉक्युमेंट्स वाचले आहेत.

लॉवनी यांच्या मते नेहरू आणि एडविना यांच्यात दैनंदिन पत्र व्यवहार होता. १९४७ ते १९६० पर्यंत हा पत्रव्यवहार अविरत सुरु होता. १९४७ साली माऊंटबॅटन दांपत्य भारतात आले आणि १९६० साली एडविना यांचा मृत्यू झाला. म्हणजेच नेहरू आणि एडविना यांची ओळख झाल्या वर्षांपासून हा पत्रव्यवहार सुरु झाला तो एडविना यांचा मृत्यू झाला तोपर्यं तसाच सुरु होता. या संपूर्ण कालावधीत हजारोंच्या संख्येने एकमेकांना पत्र पाठवली. नेहरू आणि एडविना प्रति दिवशी दोन वेळा एकमेकांना पत्र लिहायचे. ही पत्रे प्रकाश झोतात आली पाहिजेत असे लॉवनी यांचे म्हणणे आहे. साऊथहॅम्पटन विद्यापीठाने माऊंटबॅटन यांच्या सर्व डॉक्युमेंट्सची (दस्तैवजांची) खरेदी केली आहे. पण ती प्रसिद्ध करायला गांधी कुटुंबा मार्फत नकार दिला जात आहे असे लॉवनी यांचे ठाम म्हणणे आहे. त्या दस्तैवजांमध्ये असे काय आहे जे बाहेर आले तर गांधी कुटुंबासाठी अडचणीचे ठरू शकते?

लॉवनी यांच्या दाव्यानुसार एडविना हिच्या मृत्यूबद्दल काही खऱ्या गोष्टी लपवून ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्या दाव्यानुसार अचानक एक रात्री तिचा मृत्यू झाला. त्याचा ऑटोप्सी रिपोर्ट आहे, पण कुठलेही मृत्यु प्रमाणपत्र नाही. लॉवनी म्हणतात त्यांच्या अभ्यासानुसार एडविना हिने आत्महत्या केली आणि ज्या वेळी तिचा मृतदेह सापडला तेव्हा आजुबाजुला सर्वत्र नेहरूंची पत्रे होती. पण या पात्रात नेमका काय मजकूर होता हे मात्र त्यांनी सांगितलेले नाही.

पुढे ते असे सांगतात की त्यांनी ब्रिटिश सरकारकडे ‘माऊंटबॅटन डॉक्युमेंट्स’ नावाने असलेला मसुदा प्रसिद्ध करण्याची विनंती त्यांनी केली आहे. त्यासाठी कोर्टात खटला सुरू आहे. पण हे सर्व मटेरियल ब्रिटनच्या शाही घराण्याची संबंधित असल्याचे म्हटले जाते. कारण स्वतः लुईस माऊंटबॅटन हे शाही घराण्याच्या नात्यात होते. ही डॉक्युमेंट्स बाहेर आली तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडू शकतात असाही दावा केला जातो. या डॉक्युमेंट्समध्ये माऊंटबॅटन यांच्या खासगी डायरीचाही समावेश आहे. हे डॉक्युमेंट्स बघणे खरंच महत्वाचे असेल की त्या खाजगी डायरीमध्ये असे काय आहे की जे बाहेर आले तर स्वातंत्र्याच्या आणि फाळणीच्या ७५ वर्षांनंतर देखील भारत-पाकिस्तानचे संबंध बिघडू शकतात?

डिकी आणि एडविना माऊंटबॅटन यांच्यासंदर्भात एफबीआय फाईल्स पण होत्या. दुसऱ्या विश्व युद्धाच्या वेळी एफबीआयने या तयार केल्या होत्या. यापैकी एक फाईल लॉवनी यांना बघायला मिळाली. २०१७ साली त्यांना ही फाईल उपलब्ध झाली. पण जेव्हा बाकीच्या फाईल्ससाठी त्यांनी विचारणा केली. तेव्हा त्या फाईल्स नष्ट करण्यात आल्याचे सांगितले. या फाईल्स केव्हा नष्ट केल्या? हे विचारले तेव्हा लॉवनी यांनी पहिल्या फाईलची मागणी केल्यावरच इतर फाईल्स नष्ट करण्यात आल्या. त्या फाईल्समध्ये माऊंटबॅटन यांच्या खासगी आयुष्याबद्दल लिहिले होते.

या सर्व गोष्टी बघता नेहरू आणि माऊंटबॅटन दांपत्य याच्या संदर्भातील असा नेमका कोणता इतिहास जगापासून लपवला गेला आहे हे एक मोठे गूढ आहे. हा इतिहास समोर आला पाहिजे. या देशाला स्वातंत्र्य मिळताना, या देशाचे तुकडे पडताना जर स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून कोणी काही छुपे व्यवहार केले असतील तर ते प्रत्येक भारतीयाला कळलेच पाहिजेत. भारताचा शोध घेणाऱ्यांच्या वैयक्तिक इतिहासाचा शोध घेण्याची वेळ आली आहे.

Exit mobile version