26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारण'माझा राजकीय प्रवास हा भारत जोडो यात्रेबरोबर थांबू शकतो'

‘माझा राजकीय प्रवास हा भारत जोडो यात्रेबरोबर थांबू शकतो’

काँग्रेस अधिवेशनात सोनिया गांधींचे सूचक वक्तव्य

Google News Follow

Related

भारतीय राजकारणावर प्रभाव असलेल्या काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी  यांनी ‘भारत जोडो यात्रेनंतर आपला राजकीय प्रवास थांबू शकतो’ असे वक्तव्य केले आहे. काँग्रेसच ८५ वे अधिवेशन सध्या छत्तीसगढ राज्यातील  रायपूरमध्ये मध्ये सुरु आहे.सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी या अधिवेशनासाठी उपस्थित आहेत. आज सोनिया गांधी या अधिवेशनाला उपस्थित राहून त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. त्यात त्यांनी म्हंटले कि, आतापर्यंत भारतात काँग्रेसने लोकशाही मजबूत केली तर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून लोकशाहीची मूल्ये जपायचा प्रयन्त केला. मात्र ‘भारत जोडो यात्रा हीच माझ्या राजकीय जीवनाचा अखेरचा टप्पा असू शकतो’ असे वक्तव्य सोनिया गांधी यांनी यावेळेस  केले आहे. 

हे ही वाचा:

मुश्रिफांवर अखेर कोल्हापुरात गुन्हा दाखल

आझाद यांना ‘गुलाम’ म्हणणाऱ्या जयराम रमेश यांच्यावर २ कोटींचा दावा

‘जमाई’ करायला गेला कमाई आणि आला पोलिसांच्या जाळ्यात

कोविडनंतर बेरोजगारीचे प्रमाण घसरणीला.. आले इतक्या टक्क्यांवर

अनेक कठीण आव्हानांना पार करून राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा पूर्ण केली. काँग्रेसचे आणि जनतेचे  नाते पुन्हा एकदा सजीव झाले. पण आता काँग्रेसने पण कंबर कसली आहे. आम्ही देश वाचवण्यासाठी अखेरपर्यंत लढणार. आमचे कणखर कार्यकर्ते हीच खरी काँग्रेसची ताकद आहे. पक्षामध्ये शिस्तीत काम करणे हे गरजेचे आहे. आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवावा लागेल. पक्षासाठी वैयक्तिक हित बाजूला ठेवून त्याग करण्याची गरज आहे. आपल्या  पक्षाचा विजय हाच देशाचा विजय असेल. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वात आपण नक्की विजयी होऊ असा  विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला.

काँग्रेसच्या या अधिवेशनात सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांचे भारत जोडो यात्रेसाठी कौतुक केले. या यात्रेमुळे काँग्रेसपक्षात आणि जनतेमध्ये एक नवचैतन्य आले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वात आपण चांगले सरकार दिले होते. भारत जोडो यात्रेनंतर माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात येऊ शकते. काँग्रेस पक्षासाठी हा एक महत्वाचा टप्पा मानला जाईल. असेही त्या पुढे म्हणाल्या

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा