भुजबळ, आव्हाड यांना अजूनही बंगले सोडवेनात

भुजबळ, आव्हाड यांना अजूनही बंगले सोडवेनात

महाविकास आघाडी सरकार कोसळून महिना उलटला. तरीही महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांचा सरकारी बंगल्याचा मोह सुटलेला नाही. ४० मंत्र्यांपैकी आतापर्यंत फक्त १८ मंत्र्यांनी सरकारी बंगला सोडला असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसोबत शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले. आमदार गेल्याने महाविकास आघाडी खिळखिळी झाली आणि २९ जुनला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्याआधीच उद्धव ठाकरे यांनी आपले बस्तान वर्षातून मातोश्रीवर हलवले होते. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. राज्यात सत्तापालट होऊन महिना उलटला आहे. तरीही माजी २२ मंत्र्यांनी सरकारी बंगला सोडलेला नाही, अशी माहिती समोर येत आहे.

मंत्रीमंडळ बरखास्त झाल्यानंतर १५ दिवसांच्या कालावधीत हे बंगले रिक्त करावे लागतात. मात्र ठाकरे सरकार पायउतार होऊन महिना उलटला आहे. राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांसाठी मंत्रालय परिसरात, मलबार हिल आणि आमदार निवास येथील बंगल्यांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात येते. माजी मंत्र्यांनी बंगले सोडले नसल्याने भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी या मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचा मोह सोडवत नसून ४० पैकी केवळ १८ माजी मंत्र्यांनी ताबा सोडला आहे. आता आपण मंत्री नाही हे बहुदा त्यांना खरेच वाटत नसावे. हाताला धरून बाहेर काढण्याच्या आधी बंगले सोडा रे लाचारांनो, असा घणाघात यावेळी भातखळकर यांनी केला आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत भारताला तिहेरी सुवर्णपदक

वझीरएक्स क्रिप्टो एक्सचेंजची ६४ कोटींची बँक मालमत्ता ईडीने गोठवली

बोला, बजरंगाची कमाल!

केसरकर म्हणतात, तेव्हा उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते

धनजंय मुंडे, छगन भुजबळ, जयंत पाटील, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, हसन मुश्रीफ, संदिपानराव भुमरे, श्यामराव पाटील, नाना पटोले, सीताराम कुंटे यांनी अजून सरकारी निवास सोडले नसल्याचे समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले दादाजी भुसे, उदय सामंत आणी गुलाबराव पाटील मंत्रीही अद्याप बंगल्यात आहेत.

Exit mobile version