बंद यशस्वी करण्यासाठी मविआची जोर जबरदस्ती

बंद यशस्वी करण्यासाठी मविआची जोर जबरदस्ती

राज्यात ठाकरे सरकार कडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जनतेकडून प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी धाक-दपटशाहीच्या मार्गाने हा बंद करण्याचा घाट ठाकरे सरकारमधील घटक पक्षांच्या माध्यमातून राज्यात ठिकठिकाणी दडपशाहीचा अवलंब होताना दिसत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून जनतेवर जबरदस्ती करताना दिसत आहेत.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेर येथे घडलेल्या घटनेचे राजकारण करत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने बंदची हाक दिली आहे. पण गेले अनेक महिने लॉकडाउनच्या फेऱ्यात अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील जनतेने या बंदला प्रतिसाद दिला नाही. राज्यात ठिकठिकाणी सर्व डिंडाईं व्यवहार सुरळीत सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.

हे ही वाचा:

‘बंद आणि विरोध यांचा “धंदा”, गोळा होतो त्यावरच “चंदा”!’

नवाब मलिकविरोधात १०० कोटींचा दावा करणार मोहित कंबोज

चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा अंतिम फेरीत

आरीफ मोहम्मद खान म्हणतात, अल्पसंख्य ही संकल्पनाच मान्य नाही, मी भारतीय आहे

तर हा बंद यशस्वी झाला असे वाटावे यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी झुंडशाहीच्या माध्यमातून जोर जबरदस्तीने दुकाने बंद केले जात आहेत. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, अशा अनेक ठिकाणहून या घटना समोर येत आहेत. मुंबईत विविध भागात बेस्ट बसची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बेस्टच्या एकूण ८ बसेस फोडण्यात आल्या आहेत. तर अनेक ठिकाणी व्यापारी, दुकानदारांवर दुकाने बंद करण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे. राज्यात काही ठिकाणी रास्तारोको केल्याचेही पाहायला मिळाले आहे.

Exit mobile version