गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरून महाविकास आघाडीत मतभेद?

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरून महाविकास आघाडीत मतभेद?

संजय राऊत (फोटो सौजन्य एनआय)

राज्यातील मनसुख हिरेन, अंबानींच्या घरासमोरील स्फोटकांचे प्रकरण आणि त्यातच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्ब याचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. कालच दिल्लीतदेखील राजकीय हालचालींना वेग आलेला. दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवनसेना खासदार संजय राऊत यांची बैठक झाली. आज सकाळी संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

यावेळी बोलताना त्यांनी असे आरोप-प्रत्यारोप होतच असतात असे म्हटले. या संपूर्ण संवादात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री हे मंत्रीमंडळाचे प्रमुख आहेत, त्यामुळे एखाद्या मंत्र्याचे मंत्रीपद काढून घेण्याचा किंवा राजीनामा देण्याचा निर्णय संपूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा आहे. तेच काय तो निर्णय घेतील असे राऊत यांनी सांगितले.

हे ही वाचा:

राज्यात आज बैठकांचा सिलसिला

तूर्तास देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही – जयंत पाटील

त्याबरोबरच राठोड- देशमुख यांची तुलना योग्य नसल्याचे देखील ते म्हणाले. केंद्रीय यंत्रणांचा वापर हा राज्याच्या स्वायत्ततेवर घाला आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. केंद्रीय तपास यंत्रणांचा अतिरेकी वापर करून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचे स्वप्न कोणी पहात असेल तर त्यांनी झोपेतून जागे व्हावे असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवले. केंद्रीय तपासयंत्रणांनी हवे तर त्यांचे मुख्यालय दिल्ली वरून मुंबईत हलवावे काही काळासाठी, आम्हाला भिती वाटत नाही असे ते यावेळी म्हणाले.

परमबीर सिंह यांच्या बदली बाबात त्यांनी सरकारला अधिकाऱ्यांच्या बदलीचे अधिकार सरकारला असतात. ह्या बदल्या विरोधी पक्षाच्या परवानगीने करण्याती गरज नसते, असे देखील त्यांनी सांगितले.

या संवादातून त्यांनी मुख्यमंत्री कॅबिनेटचे मुख्य असल्याने गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावर निर्णय तेच घेतील हे ठासून सांगितले. याउलट काल जयंत पाटील यांनी देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे सांगितले होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील हे मतभेद पुन्हा एकदा समोर येत आहेत.

Exit mobile version