विधानसभा अध्यक्षांची निवड सरकारला करायची आहे की नाही? असा सवाल भाजपा नेते आणि महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधान सभेत उपस्थित केला. यावेळी ठाकरे सरकारच्या आवाजी मतदानाच्या जोरावर विधानसभा अध्यक्ष निवडण्याच्या निर्णयावर सुधीर मुनगंटीवार यांनी हल्ला चढवला आहे.
सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेला अध्यक्ष नाहीत. तर या निवडणुकीत विधानसभा अध्यक्षांची निवड व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नियमानुसार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदानाने पार पडते. पण ठाकरे सरकारने यात बदल करत आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्ष नेमण्याचा घाट घातला आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले असून सरकारला आपली मते फुटण्याची भीती वाटते असा आरोप विरोधी पक्ष करताना दिसत आहे.
हे ही वाचा:
इम्पेरिकल डेटासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर
१७० बहुमत असतानाही महाविकास आघाडीच्या मानगुटीवर भीतीचे भूत
ठाकरे सरकार विरोधात अभाविप आक्रमक! मुंबई विद्यापीठाबाहेर आंदोलन
सुकेश चंद्रशेखर विरुद्ध नोरा फतेही देणार साक्ष?
महाविकास आघाडीचे सरकार हे चुकीच्या पद्धतीने सत्तेवर आले आहे. त्यामुळे ते चुकीच्या पद्धतीने मतदानाचा ते आग्रह ते करीत असल्याचा आरोप आमदार मुनगंटीवार यांनी केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सभागृहात आमदार घोडेबाजार करतात असा उल्लेख केल्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला. नाना पटोले दहा वर्षे भाजपमध्ये राहिले त्यांनी पक्षातील चांगल्या संस्कारांचा सन्मान करावा असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.
सत्ताधारी विरोधी पक्षातील आमदारांसोबत बसूनही विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबद्दल तोडगा काढू शकतात. परंतु ते तसे करण्यापासून मुद्दाम स्वत:ला रोखत आहेत असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारजवळ धैर्य नाही. आवाजी पद्धतीने मतदान घेण्याच्या मुद्द्यावर आक्षेप घेत गुप्त मतदान घेण्यात यावे असे ते म्हणाले. आवाजी पद्धतीने प्रभारी अध्यक्षांनी परवानगी देऊ नये, अशी आग्रही मागणीही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला.