महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासहित मनसेचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात ठाकरे सरकार आक्रमक झाले आहे. महाराष्ट्रात मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावायला सुरुवात केली असून राज ठाकरे यांच्या विरोधातही कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत. राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले असून त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज ठाकरे यांच्या विरोधात कलम ११६, कलम ११७, कलम १३५ आणि कलम १५४ अशी कलमे लावत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेत १६ पैकी १२ अटींचे उल्लंघन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सीआरपीसी १४९ अंतर्गत नोटीस दिली जाणार असल्याची माहिती समोर यते आहे. तर राज्यभरातील मनसेच्या कार्यकर्तांनाही नोटीस देणार असल्याची समजते.
हे ही वाचा:
फरहान अख्तरला ‘तुफान’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
जर्मनीत घोषणा….मोदीजी भारताची शान!
राहुल गांधींचा क्लबमधला व्हिडीओ व्हायरल
व्लादिमीर पुतीन यांच्यावर होणार कर्करोगाची शस्त्रक्रिया
सांगली कोर्टाने राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट काढला आहे. राज ठाकरे यांना अटक करून कोर्टात हजर करण्यासंदर्भात सांगली कोर्टाने वॉरंट काढलंय. या काढलेल्या अजामीनपात्र वॉरंटची मुंबई पोलीस अंमलबजावणी करणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळत आहे. कोर्टाने काढलेल्या ऑर्डरची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याने ही कारवाई होऊ शकते असे वरिष्ठ अधिकाऱ्यांच म्हणणं आहे.
मनसेच्या जवळपास १५००० कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सीआरपीसी १४४ च्या अंतर्गत ४५५ नोटिसा देण्यात आल्या. तर सीआरपीसी १४९ च्या अंतर्गत ८०१ जणांना नोटीस देण्यात आल्या आहेत. तर सीआरपीसी १५१(३) अंतर्गत १७२ नोटीस देण्यात आल्या.