‘मविआ पेटीएमने मतदारांना पैसे देतेय’

‘मविआ पेटीएमने मतदारांना पैसे देतेय’

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ आज, ३ एप्रिल रोजी रुईकर कॉलनी येथे ‘कॉफी पे चर्चा’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. मविआ पेटीएमद्वारे, मतदारांना पैसे देत आहे, असा आरोप चंद्रकांत यांनी केला आहे. त्यासोबतच काल राज ठाकरे जे बोलले त्याबद्दल सहमत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपा उमेदवार सत्यजित कदम, सहसेवा ट्रस्टचे अध्यक्ष मिरजे यांच्या सह भागातील सामान्य नागरिकही उपस्थित होते.

कोल्हापुरकरांना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखवले होते. मात्र ते पाणी पिण्यासाठी द्यायचे होते हे बहुतेक ते विसरले होते, असा टोला चंद्रकांत यांनी मंत्री हसन मुश्रीफांना लगावला आहे. पुढे ते म्हणाले, मविआ कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी मतदारांना पैसे देण्याचे प्रयत्न करत आहे. यावर चंद्रकांत यांनी खात्रीने मविआने मतदारांना पेटीएमद्वारे पैसे दिल्याचे सांगितले आहे.

येत्या ९ आणि १० एप्रिलला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात प्रचारासाठी येणार असल्याची पाटील यांनी माहिती दिली आहे. उत्तर कोल्हापुरात आम्हला विकास करायचा आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगात देशाचा नावलौकिक वाढवला आहे. त्यांनी हिंदुंचे मानबिंदू पुनर्स्थापित करुन, हिंदूंना प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. यापूर्वी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंचे दमन केले जात होते. मात्र आता पंतप्रधान मोदींनी या ढोंगी लोकांपासून सर्वांना मुक्त केले आहे, असेही चंदक्रांत म्हणाले आहेत.

काल शिवतीर्थावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला होता. हिंदूंना आनंद वाटेल असं राज ठाकरेंचं भाषण होत, राज ठाकरेंच्या भाषणातून बाळासाहेब ठाकरेंची आठवण झाली, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत राज यांचे कौतुक केले आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या उडविल्या चिंधड्या

अरविंद केजरीवालांच्या रोड शो साठी पैसे देऊन गर्दी

‘संडे स्ट्रीट’ साठी आणखी तीन नवे मार्ग

संघभगीरथाचे संजीवक संस्मरण

राज ठाकरे जे काही बोलले ते अगदी १०० टक्के खरं बोलले आहेत. या आधी आम्ही एकटे सांगत होतो विश्वासघात झाला, मात्र आता एक आहे ज्याने या मताला दुजोरा दिला आहे. काँग्रेसने कधीही जातीवादाचे राजकरण केले नाही राष्ट्रवादीचा जन्म झाला आणि जातीचे राजकरण सुरु झाले असे राज ठाकरे म्हणाले होते, या राज ठाकरेंच्या मताला चंद्रकांत हे २०० टक्के सहमत असल्याचे म्हणाले आहेत. काँग्रेसने कधीच जातीवादाचा राजकरण केलं नाही, मात्र त्याउलट राष्ट्रवादीने प्रत्येक गोष्टीत जातीचं राजकारण केले असेही ते म्हणाले.

Exit mobile version