ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील वीजबिल माफी हा कायमच एक मोठा प्रश्न राहिलेला आहे. कोरोना काळात जिथे एकीकडे जिथे लोकांचा कणा मोडलेला असतानाही राज्यात नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले आली होती. तर कोरोनामुळे शेतकऱ्यांपासून व्यापारी वर्गापर्यंत सगळेच आर्थिक संकटात सापडले होते. अशा परिस्थितीत राज्य सरकारने वीजबिलात सवलत द्यावी अशी मागणी वारंवार झाली. पण तरीही राज्य सरकारने त्यावर कोणताच दिलासादायक निर्णय घेतला नाही.
आज देखील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातून वीजबिल माफी संदर्भात प्रश्न विचारले जात आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे शुक्रवार, ३० जुलै रोजी कोकणच्या दौऱ्यावर गेले होते. पण या पाहणी दौऱ्यानंतरही त्यांनी कोकणवासीयांच्या तोंडाला पानेच पुसली. जोवर कोकणातली स्थिती पूर्ववत होत नाही तोवर वीजबिल वसुली थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असे त्यांनी जाहीर केले. पण नुकसान झालेल्या नागरिकांची बिले माफ करण्याची घोषणा मात्र त्यांनी केली नाही.
हे ही वाचा:
कोर्ट म्हणाले, त्या मुलांची फी परत करा!!
महापुरामुळे चिपळूणला बसला मोठा फटका; किती झाले नुकसान?
पीव्ही सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक
…असा मिळाला सचिनला त्याचा नवा पार्टनर!
वीजबिल माफीचा निर्णय मी घेऊ शकत नाही. हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल असे म्हणत नितीन राऊतांनी काढता पाय घेतला. त्यामुळे आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पुरग्रस्तनांही वीजबिलात सवलत मिळणार नाही का? असा सवाल विचारला जात आहे.
या साऱ्या प्रकरणावरून भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी नितीन राऊतांवर निशाणा साधला आहे. “पत्रकारांनी ‘पुरग्रस्तांना विज बिल माफी देणार का? असा सवाल केल्यामुळे साहेबांचा मूड गेला. प्रश्नाचे उत्तर न देता त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली. प्रश्नकर्त्या पत्रकाराला दाबण्याचा प्रयत्न राऊतांच्या चेल्यांनी केला.” असे भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
ऊर्जा मंत्री @NitinRaut_INC
यांना चिपळूनमध्ये पत्रकारांनी 'पुरग्रस्तांना विज बिल माफी देणार का? असा सवाल केल्यामुळे साहेबांचा मूड गेला. प्रश्नाचे उत्तर न देता त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली. प्रश्नकर्त्या पत्रकाराला दाबण्याचा प्रयत्न राऊतांच्या चेल्यांनी केला. pic.twitter.com/stxjPfKyNS— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 30, 2021