महायुतीने आणले मविआच्या नाकी ‘नऊ’

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला झटका

महायुतीने आणले मविआच्या नाकी ‘नऊ’

राज्यात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवार, १२ जुलै रोजी निवडणूक पार पडली. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा निवडणुकीचा सामना रंगाला होता. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले होते त्यामुळे कोणता उमेदवार पराभूत होणार याकडे लक्ष असणार होते. त्यामुळे आपापली मतं फुटू नयेत यासाठी सर्व पक्ष प्रयत्नशील होते. अखेर या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे. तर, महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत विधानसभेतील सक्रिय २७४ आमदारांनी गुप्त मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये महायुतीचे सर्व ९ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीच्या गणितात देवेंद्र फडणवीसांची जादू कायम राहिली आहे.

महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले असून अकराव्या जागेसाठी ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर अन् शेकपाचे जयंत पाटील यांच्यात चुरस आहे. तर, भाजपाकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर, शिवसेनेकडून भावना गवळी, कृपाल तुमाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर, शिवाजी गर्जे यांचा विजय झाला आहे. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांचाही विजय झाला आहे.

हे ही वाचा:

माजी मुख्यमंत्री रेड्डी यांच्यासह दोन आयपीएस अधिकाऱ्यांवर गुन्हा

२५ जून ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून घोषित!

कर्नाटक सरकारकडे विकासकामांसाठी पैसा नाही

भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी फाईलमध्ये पैसे का ठेवले…

भाजप उमेदवार पंकजा मुंडे, परिणय फुके आणि योगेश टिळेकर विजयी झाले आहेत. पंकजा मुंडे यांना २६, परिणय फुके यांना २६, योगेश टिळेकर यांना २६ मतं मिळाली आहेत. अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे निवडणूक लढवत होते. राजेश विटेकर यांना २३ मतं आणि गर्जे यांना २४ मते मिळाली आहेत. शिवसेनेचे कृपाल तुमाने यांना २५ मते तर भावना गवळी यांना २४ मते मिळाली आहेत. तर, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना २५ मते मिळाली आहेत.

Exit mobile version