मविआ सरकारने केली लोकशाहीची क्रूर हत्या

मविआ सरकारने केली लोकशाहीची क्रूर हत्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवार, २४ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. गोळवली येथून राणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. राणे यांच्या अटकेवरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापलेले आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते या अटकेच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून महा विकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील ‘मविआ सरकारने लोकशाहीची क्रूर हत्या केली आहे’ असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे.

हे ही वाचा:

‘उद्धव ठाकरे ममतांसारखे विचारी, संयमी’

ठाणे: शिवसेना महापौरच म्हणतात ‘नारायण राणे अंगार है!’

आम्ही अशा कारवाईला घाबरत नाही! – जे.पी.नड्डा

हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र!!!

काय म्हणाले चंद्रकांत पाटील
महाराष्ट्राने आज ३ पक्षांचा ३ पैशांचा तमाशा पाहिला. जन आशीर्वाद यात्रेला जनता-जनार्दनाने भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे पोटदुखी झालेल्या मविआ सरकारने हीन पातळी गाठली. केंद्रीय मंत्र्याला अटक करून लोकशाहीची क्रूर हत्या करणाऱ्या मविआ सरकारचा निषेध करावा तितका कमीच!

कोकण हा केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा बालेकिल्ला. राणेसाहेब कोकणात निधड्या छातीने टक्कर देतात, याचा शिवसेनेला राग आहे. त्यामुळे राज्याची मान खाली गेली तरी चालेल, राणेंना अटक करायचीच या सूडबुद्धीने मविआ सरकारने कारवाई केली. आघाडीतल्या दोन घटकपक्षांचं कारवाईला समर्थन आहे का?

संसदेसह प्रदीर्घ विधिमंडळ कारकीर्दीचा अनुभव असलेले माननीय शरद पवार मविआ आघाडीचे शिल्पकार आहेत. लोकशाही मूल्ये मानणाऱ्या पवारसाहेबांच्याच पक्षाकडे महाराष्ट्राचे गृहखाते आहे. राणेसाहेबांच्या अटकेसाठी शिवसेनेने गृहमंत्र्यांनी परवानगी घेतली होती? पवारसाहेब यावर काही बोलतील का?

Exit mobile version